Kenya Plane Crash : आफ्रिकेच्या घानामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना ताजी असताना केनियामध्येही भयंकर अपघात घडला आहे. केनियाची राजधानी नैरोबीमध्ये भयंकर विमान अपघात झाला आहे. या विमान अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये २ डॉक्टर, २ नर्स आणि २ सामान्य लोकांचा समावेश आहे.
केनियाच्या सिव्हिल एव्हिएशन ऑथोरिटीने दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. एअर ॲम्बुलन्स वस्तीतील एका शाळेच्या इमारतीवर कोसळलं. या दुर्घटनेत काही घरे उद्ध्वस्त झाले आहेत. विमान अपघातात काही जण जखमी झाले आहेत. विमान कोसळल्याने शाळेच्या इमारती उद्ध्वस्त झाली आहे.
आम्बू काऊंटी कमिश्नर हेनरी वाफुला यांनी माहिती देताना म्हटलं की, 'विमान दुर्घटनेत जखमी झालेल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. विमान दुर्घटना आज दुपारी २ वाजून १४ मिनिटाला घडली. एअर अॅम्बुलन्स विल्सन विमानतळावरून सोमालियासाठी रवाना झाला होतं. उड्डाणानंतर ३ मिनिटात एअर अॅम्बुलन्स बेपत्ता झाला होतं. त्यांचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला होता'.
एअर अॅम्बुलन्स उटवाला येथील मवीहोको माध्यमिक शाळेवर कोसळली. विमानाला कोसळल्यानंतर आग लागली. दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली. स्थानिक लोकांनी विमान दुर्घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरु केलं. या अपघात प्रकरणी चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
हॅलिकॉप्टर कोसळून ८ जणांचा मृत्यू
कॅरिबियन देश घानामध्ये हॅलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सरकारचे २ बडे मंत्री आणि इतर ६ लोकांचा मृत्यू झाला. या अपघातात संरक्षण मंत्री एडवर्ड ओमान बोआमाह आणि पर्यावरण मंत्री इब्राहिम मुर्तला मोहम्मद यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर सरकारने अपघाताचं वर्णन राष्ट्रीय दुखवटा म्हणून केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.