Punjab Road Accident 
देश विदेश

Accident : लग्नाहून येताना भीषण अपघात! SUV आणि पिकअपची जोरात धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू, ९ गंभीर

Punjab Road Accident : पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात लग्नाहून परतताना एसयूव्ही आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तीन लहान मुलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Five killed in SUV pickup collision in Punjab : पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यात लग्नाहून घराकडे येणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. एसयूवी (SUV) आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे. अपघातात ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Fazilka Road Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मृत हे फाजिल्का येथील कर्णी खेरी गावचे रहिवासी होते . ते जलालाबादमधील तिवाना कलान गावात एका लग्नाला गेले होते. लग्नाहून घराकडे परत येत असताना थेह कलंदर गावाजवळ काळाने घाला घातला. त्यांच्या एसयूव्हीची समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनशी धडक झाली.

या भीषण अपघातात तीन लहान मुलांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या ९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक रहिवासी आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना जवळच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर पंचनामा करत गुन्हा दाखल केला. अपघाताची माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. अपघात इतका भीषण होता की गाड्याचा चक्काचूर झाला होता. फाजिल्काचे पोलीस अधीक्षक सत्येंद्र सिंह यांनी या भीषण अपघाताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, भीषण अपघाताची माहिती मिळताच फाजिल्काचे आमदार नरेंद्र पाल सिंह सावना यांनीही रूग्णालयात जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे रेल्वे स्थानकातून १ ते १३ नोव्हेंबर पर्यंत लाखो प्रवाशांनी केला प्रवास

Weather Update: देशाला चक्रीवादळाचा धोका, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ९ राज्यांना इशारा, महाराष्ट्रात काय स्थिती?

Monday Horoscope : घरगुती खर्च वाढेल! ५ राशींना पैशाची चणचण जाणवेल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

लातूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू|VIDEO

पुण्यात मतदारयादीत मोठा घोळ; 15 हजार मतदारांची नावं पुण्याबाहेर ट्रान्सफर?

SCROLL FOR NEXT