Vikram Kirloskar Passes Away  Saam TV
देश विदेश

Vikram Kirloskar : टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झाले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Vikram Kirloskar Passes Away : उद्योग क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झाले आहे. मंगळवारी (२९ नोव्हेंबर) रात्री ही दु:खद घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम किर्लोस्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.  (Latest Marathi News)

विक्रम किर्लोस्कर हे टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जातं. आपल्या कार्यकुशल नेतृत्वाने त्यांनी टोयोटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.

विक्रम किर्लोस्कर हे 64 वर्षांचे होते. आज दुपारी 1 वाजता बंगळुरुमधील हेब्बल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय विक्रम किर्लोस्कर यांना जातं. विक्रम किर्लोस्कर हे MIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर होते. त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT