Amravati News: आंध्र प्रदेशमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये अन्नामय्या जिल्ह्यात एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला लुटण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरेम रेड्डी असे या हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. (Latest Marathi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची हत्या मंगळवारी रात्री करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी केला आहे. शेतकरी नरेम हा गावात दूध द्यायला जात होता, त्यावेळी नरेम यांना हल्लेखोरांनी रोखलं. त्यानंतर त्याचे हात-पाय बांधले. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली.
६२ वर्षीय नरेश हे एक किलोमीटर लांब असलेल्या नातेवाईकांना दूध द्यायला निघाले होते. नरेम यांच्या पत्नीने सांगितलं की, काही अज्ञात व्यक्ती टोमॅटो खरेदी करण्यासाठी आल्याचे शेतकरी नरेम यांची हत्या केली.
दरम्यान, शेतकरी नरेम यांनी काही दिवसांपूर्वीच शेतातील टोमॅटो विकून ३० लाख रुपये कमाविले होते. हत्येचं कारण देखील याच्याशी संबंधित असू शकतं, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकारी केशप्पा यांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी चार पथक गठीत केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तीन ते चार जणांनी शेतकरी नरेम यांची हत्या केली आहे. तसेच पोलिसांनी शेतकरी नरेम यांच्या कुटुबीयांशी देखील वार्ता केली आहे. शेतकरी नरेम यांचे पत्नी आणि दोन मुली असं कुटुंबं होतं.
काय आहे प्रकरण?
नरेम रेड्डी हे आपल्या गावापासून लांब १ किलोमीटर लांब नातेवाईकाकडे दूध पोहोचविण्यासाठी जात होते. त्यावेळी काही शेतात आले, त्यावेळी मृत व्यक्तीची पत्नी घरात होती. त्यावेळी काही लोकांनी शेतात नरेम यांची विचारणा केली.
मात्र, नरेम घरात नसल्याचे अज्ञातांना सांगितले. या शेतकऱ्याने टोमॅटो विकून 30 लाख रुपये कमावल्याचे सांगण्यात येत आहे. पैसे लुटण्यासाठी आल्याच्या संशयातून हत्या केल्याचा आरोप नरेम यांच्या पत्नीने केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.