Petrol Diesel Prices
Petrol Diesel Prices Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण; झटपट चेक करा इंधनाचे दर

Ruchika Jadhav

Petrol Diesel Latest Price : कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $73 पर्यंत आहे. तसेच डब्ल्यूटीआयचा दर प्रति बॅरल $67.29 इतका आहे. सरकारी कंपन्यांनी मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या किंमतींध्ये घसरण झाल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक शहारांमध्ये कच्चा तेलाच्या किंमती घसल्या आहेत. मात्र दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये कच्चा तेलांच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. (Today Petrol Diesel Price)

मंगळवारी सकाळी सरकारी कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार, गाझियाबादमध्ये पेट्रोल 14 तर डिझेल 13 पैशांनी महाग झाले आहे. पेट्रोल 96.58 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे. तर डिझेलची किंमत 89.75 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.

लखनऊमध्ये आज पेट्रोल 96.57 रुपये प्रति लीटर असून डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे. पेट्रोलचे दर 15 पैशांनी महागलेत तसेच डिझेलचे दर 14 पैशांनी वाढले आहेत. गुरुग्राममध्ये पेट्रोलचे दर 49 पैशांनी घसरले आहेत.

तसेच डिझेलच्या दरांमध्येही 19 पैशांची घसरण पहायला मिळत आहे. गुरुग्राममध्ये आज पेट्रोलचे दर 96.89 रुपये प्रति लीटर झाले आहेत तर डिझेल 90.24 रुपये प्रति लिटर आहे.

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.आज दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.82 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल- डिझेलचे रोजचे दर पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT