Bharat Jodo Yatra  saam tv
देश विदेश

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस; सुरक्षेचं कारण देत या पक्षांनी फिरवली पाठ

काँग्रेसने भारत जोडो यात्रेच्या समारोपाला देशातील 21 प्रमुख पक्षाला आमंत्रण दिलं आहे.

Shivaji Kale

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी 12 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून 4,080 किलोमीटरचे अंतर पूर्ण केलं आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी 12 जाहीर सभा, 100 हून अधिक सभा, 13 पत्रकार परिषदा घेतल्या. ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेशमधून जम्मू-काश्मीरला पोहोचली आहे. (Latest Bharat Jodo Yatra News)

काँग्रेसने भारत जोडो यात्रेच्या समारोपाला देशातील 21 प्रमुख पक्षाला आमंत्रण दिलं आहे. मात्र, सुरक्षेचं कारण देत काही राजकीय पक्ष सहभागी होणार नाहीत. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष, समाजवादी पार्टी यासारखे पक्ष सहभागी होणार नाही.

कोणते पक्ष होणार सहभागी?

एमके स्टालिन यांच्या नेतृत्वातील द्रविड मुन्नेत्र कड़गम (डीएमके), राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (एनसीपी), तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, सीपीआई (एम), सीपीआई, विदुथलाई चिरुथाइगल काची (वीसीके), केरळ कॉग्रेस, फारूक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वातील नॅशनल कॉन्फ्रेंस, महबूबा मुफ्ती यांचा पीपुल्स डेमोक्रेटिक पक्ष (पीडीपी) आणि शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या सभेला उपस्थित राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT