Petrol Diesel Latest Price Saam tv
देश विदेश

Petrol Diesel : पेट्रोल-डिझलच्या दरात बदल; जाणून घ्या स्वस्त इंधनाचे दर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट

वृत्तसंस्था

Petrol Diesel : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 76.10 डॉलर आणि WTI प्रति बॅरल 71.02 डॉलरने विकले जात आहे. त्यातच आता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. इथे अनेक राज्यांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Petrol Diesel Price Today)

राजस्थानमध्ये पेट्रोल 0.59 पैश्यांनी स्वस्त होऊन 108.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 0.54 पैश्यांनी घसरून 93.74 रुपयांवर आले आहे. छत्तीसगडमध्ये पेट्रोल 0.40 पैश्यांनी वाढून 103.18 रुपये आणि डिझेल 96.15 रुपयांवर पोहोचले आहे.

उत्तर प्रदेशात डिझेल 0.20 पैश्यांनी स्वस्त झाले असून ते 89.47 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 0.33 पैश्यांनी वाढून 96.92 रुपये आणि डिझेल 0.32 पैश्यांनी वाढून 87.26 रुपये प्रति लिटर झाले आहे. याशिवाय हरियाणा आणि बिहारमध्ये इंधन स्वस्त झाले आहे. देशातील 4 महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Turmeric Bath Benefits: हळदीच्या पाण्याने आंघोळ करा, त्वचेचे इन्फेक्शन, खाज आणि मुरुम होतील कमी

Satara Accident: अंबाबाईच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारला ट्रकची जोरदार धडक, चौघांचा जागीच मृत्यू

MHADA Lottery : घरं घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; म्हाडाने वाढवली अर्ज करण्याची मुदत; शेवटची तारीख काय? वाचा

Maharashtra News Live Update: पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन

Tiger Shroff : टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात नवा खुलासा; शूटर्सच्या निशाण्यावर होता सलमान खान, पण...

SCROLL FOR NEXT