TMC NAME-SYMBOL FROZEN saam tv
देश विदेश

पक्षफोडीसाठी भाजप-आयोगाची युती, बड्या नेत्याचा आरोप, तृणमूलचं चिन्ह गोठवलं, शिवसेनेचं काय होणार?

TMC Party Symbol Row:तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर आता राहुल गांधींनी पक्षफोडीवरून सत्ताधाऱ्यांसह निवडणुक आयोगावर जोरदार हल्लाबोल केलाय... राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? तृणमूलसंदर्भात आयोगानं घेतलेल्या निर्णयानंतर शिवसेनेचं काय होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेवर आल्यानंत ममता बॅनर्जींच्या टीमसीत उभी फूट पडली. फुटीर आमदारांच्या गटानं थेट टीमसीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला. प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं आणि आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. आणि तातडीनं दोन्ही गटांना हंगामी चिन्ह आणि नावंही बहाल केलं. मात्र यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस. प्रत्येक वेळी एकच पॅटर्न वापरून भाजप आणि निवडणूक आयोग मिळून एक पक्ष फोडतात. त्यानंतर त्यांचे निवडणूक चिन्ह काढून घेतले जाते. जेव्हा संपूर्ण पक्षच चोरीला जाऊ शकतो, तेव्हा मत चोरी होणं अवघड नाही. मत चोरी, सरकार चोरी, आता पक्ष चोरी हे आपल्या लोकशाहीच्या ऱ्हासाचं प्रतीक बनलंय. निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी जनादेशाचं रक्षण करण्याची आहे. मात्र याउलट ते जनतेचा निर्णय बदलणाऱ्या शक्तींनाच मदत करतायत. हा लढा केवळ ममता बॅनर्जी यांचा नाही. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक इच्छिणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाचा आणि प्रत्येक मतदाराचा हा लढा आहे.

दुसरीकडे आयोगानं तृणमूल पक्ष- चिन्हाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष- चिन्हाचा वादालाही नव्यानं तोंड फुटलयं... शिवसेना कुणाची यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत कोर्टानं शिवसेनेचं चिन्ह आणि नाव गोठवून हंगामी चिन्ह का बहाल केलं नाही असा सवाल सरकार आणि आयोगाला केला....त्यामुळेच ठाकरेसेनेनं धनुष्यबाण फुटीर गटाला देण्यामागे शेकडो कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केलाय.

आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पक्ष फोडाफोडीचा मुद्या पुन्हा तापलाय. तर दुसरीकडे तृणमूलचे पक्ष-चिन्ह गोठवण्यात आल्यानं शिवसेना पक्ष- चिन्ह गोठवण्याचेही आदेश दिले जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT