Tirupati Laddu Ghee Case Saam
देश विदेश

तिरूपतीच्या प्रसादात भेसळयुक्त तुपाचा वापर, ED ने कंपनीच्या मालकाला ठोकल्या बेड्या, देशभरात खळबळ

Tirupati Laddu Ghee Case : तिरुपती लाडू प्रसादातील तूप भेसळ प्रकरणात ED ने सुकृती फूड्सचे मालक कैलाश चंद मंगला यांना अटक केली आहे. ED च्या दाव्यानुसार, २०१९ ते २०२४ दरम्यान ९६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप तयार करण्यात आले.

Namdeo Kumbhar

प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादातील (लाडू) तूप भेसळ प्रकरणात ED ने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी ईडीने तूप पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. तिरुपती लाडू बनवण्यासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आणि भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा गंभीर आरोप या कंपनीवर आहे. या अटकेमुळे आता या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार आणि मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

ईडीने तूप बनवणाऱ्या कंपनीचे मालक कैलाश चंद मंगला यांना मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. शुक्रवारी झालेल्या या कारवाईनंतर ईडीने सांगितले की, तिरुपती लाडू प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तूप रिफाइंड पाम तेल, पामोलिन आणि विविध रसायनांपासून बनवले जात होते. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) तूप भेसळ प्रकरणी हैदराबाद येथील ईडी कार्यालयाने सुकृती फूड्सचे कैलाश चंद मंगला यांना १७ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले.

एजन्सीने सांगितले की, कैलाश चंद मंगलाला विशाखापट्टणम येथील मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.

तुपाऐवजी या तेलांचा वापर

तिरुपती लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे भेसळयुक्त तूप हे रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल तेल, पामोलिन आणि एमजी-९०, मोनोग्लिसराइड्स, मायव्हेसिट सॉफ्ट ४०० व ऍसिटिक ऍसिड एस्टर यांसारख्या विविध रसायनांचा वापर करून तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचा दावा ईडीने केला आहे. ते टीटीडीला पुरवण्यासाठी 'अ‍ॅगमार्क स्पेशल ग्रेड गाईचे तूप' म्हणून खपवण्यात आले, असेही ईडीने म्हटलेय.

९६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप

२०१९-२०२४ दरम्यान टीटीडीला पुरवलेल्या अशा तुपाचे मूल्य २३० कोटी रुपये होते आणि यापैकी ९६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप मंगलाने तयार केले होते असा दावा ईडीने केला आहे. एजन्सीने म्हटले आहे की, मंगला या प्रकरणातील सह-आरोपींपैकी एक होता. त्याने भेसळयुक्त पदार्थ मिळवण्यास मदत केली आणि त्याच्या कारखान्यात भेसळयुक्त तूप तयार केले.

"त्याने श्री वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज, मालगंगा मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि ए. आर. डेअरी फूड्स यांसारख्या विविध शेल कंपन्यांमार्फत भेसळयुक्त तुपाच्या पुरवठ्याचे समन्वयही साधले," असे ईडीने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर; सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अभिजित दिपकेंची मागणी

Men’s Health Checkup After 30: वयाच्या 30 नंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ 7 महत्त्वाच्या हेल्थ टेस्ट

EPFO On WhatsApp: EPFO चं WhatsApp चॅनेल! PF-पेन्शनचे अपडेट्स मिळणार थेट मोबाइलवर; जॉइन करण्याची A to Z प्रोसेस जाणून घ्या

Pune : पुण्यात दूध थेट १० रुपयांनी महागलं! भाव वाढण्यामागचं 'हे' आहे सर्वात मोठं कारण

Ajit Agarkar: अजीत आगरकर यांचा कार्यकाळ संपणार? BCCI च्या निर्णयाआधी दोन दिग्गजांची नावं चर्चेत, कोण होणार नवा चीफ सिलेक्टर?

SCROLL FOR NEXT