Indian Railway Freepik
देश विदेश

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! तेजस, अमृत भारतसह १२ ट्रेनच्या टायमिंगमध्ये बदल; प्रवास करण्याआधी नवे वेळापत्रक वाचा

Indian Railways changes timing of 12 trains from January 30 2026 : भारतीय रेल्वेने तेजस, हमसफर, अमृत भारतसह १२ ट्रेनच्या वेळापत्रकात बदल केला आहे. ३० जानेवारी २०२६ आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन वेळा लागू होतील. प्रवास करण्यापूर्वी नवे वेळापत्रक नक्की तपासा.

Namdeo Kumbhar

Tejas Express and Humsafar Express new timetable update : पुढील काही दिवसांत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेकडून १२ ट्रेनच्या टायमिंगमध्ये बदल करण्यात आला. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ऑपरेशनल कारणांसाठी हा बदल करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आलेय. वेळापत्रक बदललेल्या ट्रेन्समध्ये तेजस एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि पॅसेंजर ट्रेनचा समावेश आहे. या ट्रेन्सच्या वेळात कधी अन् किती बदल झालाय, हे रेल्वेने प्रवास करण्याआधीच तपासा... अथवा रेल्वे स्थानकावर गेल्यावर ताटकळत बसावे लागेल.

१२ ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल करण्याचा कारण ऑपरेशनल सुधारणा आहेच. पण त्याशिवाय रूळाची देखभाल आणि ट्रेनच्या वेळेवर नियंत्रण सुधारण्यासाठी करण्यात आल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगतले. रेल्वेने जारी केलेले हे नवे वेळापत्रक शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. तर काही ट्रेन्सच्या वेळापत्रकात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बदल होणार आहे.

कोणत्या १२ ट्रेन्सच्या वेळात बदल होणार -

५४०२० रोहतक जंक्शन-रेवाडी जंक्शन पॅसेंजरच्या वेळापत्रकात ३० जानेवारी २०२६ पासून बदल करण्यात येणार आहे. तर ८२५०२ लखनौ जंक्शन-नवी दिल्ली तेजस एक्सप्रेसच्या वेळापत्रकात १ फेब्रुवारी २०२६ पासून बदल होणार आहे. तर २२४४९ गुवाहाटी-नवी दिल्ली एक्सप्रेस ३१ जानेवारी २०२६ पासून बदल होणार आहे. त्याशिवाय, सिलचर-नवी दिल्ली ईशान्य संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि १२३४९ गोड्डा-नवी दिल्ली हमसफर एक्सप्रेसच्या वेळा २ फेब्रुवारी २०२६ पासून बदलणार आहेत. १४६१९ आगरतळा-फिरोजपूर कॅन्ट त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेसच्या नवीन वेळा ५ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होतील, असे रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आले.

सुपरफास्ट, अमृत भारत आणि प्रवासी गाड्यांचाही समावेश

२२४२७ बलिया-आनंद विहार सुपरफास्ट एक्सप्रेस आणि १२५८३ लखनौ जंक्शन-आनंद विहार डबल डेकर एक्सप्रेसच्या वेळेत १ फेब्रुवारी २०२६ पासून बदल करण्यात आला आहे. १५५५७ दरभंगा जंक्शन-आनंद विहार अमृत भारत एक्सप्रेस आणि ५४३२९ बालामऊ जंक्शन-शाहजहानपूर जंक्शन पॅसेंजर ट्रेनच्या नवीन वेळा २ फेब्रुवारी आणि ३० जानेवारी २०२६ पासून लागू होतील. ५४०७५ बरेली जंक्शन-दिल्ली जंक्शन पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत ३० जानेवारी २०२६ पासून बदल होणार आहे, तर १३०२० काठगोदाम-हावडा जंक्शन बाग एक्सप्रेसच्या वेळेत तात्काळ बदल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रत्नागिरीत शिवसैनिकांनी वाहीली अजित पवार यांना श्रद्धांजली

Winter Skin Care : गुलाबी गाल अन् कोमल त्वचा हवीय? मग ताक वापरून वाढवा सौंदर्य

Blouse Neck Designs: ब्लाऊजच्या गळ्याची हटके डिझाईन, या आहेत ट्रेडिंग 5 स्टाईल्स

Accident News : पुण्यात मद्यधुंद बस चालकाचा थरार! ३० ते ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसने अनेक वाहनांना दिली धडक

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करा: संजय राऊत

SCROLL FOR NEXT