TikTok In America Saam Tv
देश विदेश

TikTok : चीनला मोठा झटका; भारतापाठोपाठ अमेरिकेतही केली जाणार TikTok वर बंदी

TikTok In America : यूएस हाऊसने टिकटॉकवर बंदी घालणारे हे विधेयक प्रचंड बहुमताने मंजूर करत चीनला मोठा झटका दिलाय.

Bharat Jadhav

Tiktok Ban Bill Passed In Us Parliament :

भारतानंतर अमेरिकेनेही चीनला मोठा धक्का दिलाय. यूएस हाऊसने चिनी ॲप टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे. यूएस हाऊसने टिकटॉकवर बंदी घालणारे हे विधेयक प्रचंड बहुमताने मंजूर करत चीनला मोठा झटका दिलाय.(Latest News)

राजकीयदृष्ट्या विचारधारेने वेगवेगळ्या खासदरांनी टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी मोठी एकजूटता दाखवली. वॉशिंग्टनमधील सभागृहात एकमताने ठराव मंजूर केला. खासदारांनी प्रस्तावित कायद्याच्या बाजूने ३५२ जणांनी मतदान केलं तर विरोधात फक्त ६५ मतदान केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमेरिकेच्या खासदारांनी बुधवारी बहुमताने विधेयकला मंजुरी दिली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे TikTok ला त्याच्या चिनीमधील मालकापासून वेगळे व्हावे लागेल किंवा युनायटेड स्टेट्समध्ये त्याला बंदी घातली जाईल. अमेरिकेच्या या कायद्याने व्हिडिओ-शेअरिंग ॲपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दिली आहे, दरम्यान जगभरात टिकटॉक लोकप्रिय आहे.

व्हाईट हाऊसने ही माहिती दिली

जो बायडन हे या विधेयकावर स्वाक्षरी करतील. जेव्हा हे विधयेक अध्यक्षांच्या पटलावर जाईल तेव्हा ते अधिकृतपणे "प्रोटेक्टिंग अमेरिकन्स फ्रॉम फॉरेन एनीमी कंट्रोल्ड ऍप्लिकेशन्स ॲक्ट" म्हणून ओळखले जाईल. TikTok ची मूळ कंपनी ByteDance ला १८० दिवसात अ‍ॅप विकावे लागेल. नाहीतर युनाटेड स्टेट्समधील अ‍ॅपल आणि गुगल अ‍ॅप स्टोअर्सवर या अ‍ॅपला बंदी घातली जाईल. तसेच या अ‍ॅपचा उपयोग राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकेदायक असल्याचं घोषित करण्याचा अधिकार देशाच्या राष्ट्रपतींना म्हणजे जो बायडन यांना आहे, असे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT