Rajasthan Accident  Saam TV
देश विदेश

Car Accident Video : भरधाव कार दुभाजकाला धडकून भीषण अपघात, ३ मित्रांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Rajasthan Car Accident News : शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कारला आग लागल्यानंतर दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर अन्य तीन जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.

प्रविण वाकचौरे

Car Accident News :

राजस्थानमधील अजमेर येथे एका भीषण अपघातात तीन मित्रांचा होरपळून मृत्यू झाला आहे. वेगवान कारने डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर कारने पेट घेतल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी उपस्थित लोकांनी गाडीच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले.

शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कारला आग लागल्यानंतर दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर अन्य तीन जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. जखमींना उपचारसाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच आणखी एकाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अन्य दोन जखमींवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा हा त्याचा मित्र उमेश आणि अन्य तीन जणांसह कारमधून पुष्कर येथे गेला होता. पुष्करहून परतत असताना अजमेर येथील लोहगल रोडवर त्यांची कार दुभाजकावर आदळली. वाहनाचा वेग एवढा जास्त होता की ते विरुद्ध दिशेला वळले आणि क्षणात कारने पेट घेतला.  (Latest Marathi News)

कारमध्ये गॅस किट लावलेली होती. त्यामुळे कारने क्षणात पेट घेतला. काही वेळात कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. कार उलटल्याने पाचही जणांना बाहेर पडणे अशक्य होते. सर्वजण जीव वाचवण्यासाठी मोठमोठ्याने आवाज देत होते. त्यावेळी जणांनी कसंबसं तीन जणांना कारच्या बाहेर काढलं. मात्र आग वाढल्याने दोघांना बाहेर काढणे शक्य झालं नाही आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT