South Africa
South Africa Saam TV
देश विदेश

South Africa News: अजब प्रकार! १०० बायका आणि ५०० मुलं असलेला हा माणूस आहे तरी कोण?

Ruchika Jadhav

South Africa: काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका मुलाने दोन सख्या आणि जुळ्या बहिणींबरोबर विवाह केला होता. यावेळी हे लग्न जोरदार गाजलं होतं. नवरदेवाला असं केल्याने लगेचचं अटक करण्यात आली होती. भारतात एका पेक्षा दोन लग्न किंवा एका व्यक्तीला दोन पत्नी असणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेत चक्क एका राजाला एक दोन नाही तर तब्बल १०० बायका आणि ५०० मुलं आहेत. (Latest Marathi News)

कॅमेरूनमध्ये एका पेक्षा जास्त लग्न आणि जास्त पत्नी असणे ही मुळातच एक परंपरा आहे. त्यामुळे हे सर्व काही तेथील कायद्याच्या चौकटीत बसते. कॅमेरूनचा राजा अबुम्बी द्वितीय याची ही गोष्ट आहे. देशात पत्नी आणि लग्नासाठी कोणतीही मर्यादा नसल्याने या राजाला सध्या १०० पत्नी आहेत.

काय आहे येथील प्रथा?

येथील प्रथेनुसार एका राजाला एका पेक्षा जास्त पत्नी असणे शुभ माणले जाते. पहिल्या राजाचे निधन झाल्यावर येणाऱ्या दुसऱ्या राजाला पहिल्या राजाच्या पत्नी आणि मुलांचा संभाळ करावा लागतो. राजा अबुम्बीने देखील त्याच्या वडिलांचे निधन झाल्यावर वडीलांच्या जागी राजा म्हणून विराजमान झाल्यावर वडिलांच्या राण्या आणि त्यांच्या मुलांची जबाबदारी देखील राजा अबूम्बी द्वितीय यांच्यावर आली आहे.

अबुम्बी द्वितीय यांना वडिलांकडूनच ७२ बायका पत्नी म्हणून मिळाल्या होत्या. तसेच अनेक मुलं देखील मिळाली होती. या देशामध्ये राजांच्या जेवढ्याही राण्या आहेत त्या सर्व उच्च शिक्षित आहेत. यातील प्रत्येकीला वेगवेगळी भाषा अवगत आहे. सध्या सोशल मीडियावर अबुम्बी द्वितीय आणि त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो जोरदार व्हायरल होतं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT