Narendra Modi News Saam tv
देश विदेश

Narendra Modi News: नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक; अज्ञात व्यक्तीने फुलांसह वाहनावर फेकला मोबाईल

नरेंद्र मोदी यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने मोबाईल फेकल्याचे समोर आले आहे.

Vishal Gangurde

Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक झाल्याचे निदर्शनास आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने मोबाईल फेकल्याचे समोर आले आहे. मोदी यांच्या वाहनावर हेतुपुरस्सर फेकला की फुले फेकताना ही घटना घडली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी देखील कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आगामी कर्नाटक निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी कंबर कसली आहे.

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील रोड शोमध्ये अज्ञात व्यक्तीने मोबाईल फेकल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तीन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत तिसऱ्यांदा मोठी चूक झाली आहे.

अज्ञात व्यक्तीने पंतप्रधान मोदी यांच्या वाहनावर मोबाईल फेकल्याने एसपीजी जवानांनी तो तातडीने काढून घेतला. भाजप समर्थकाच्या हातातून चुकून निसटल्याचे समोर आले आहे , प्राथमिक तपासात ही माहिती समोर आली आहे, पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याची घडली होती. कर्नाटकात २५ मार्च रोजी ही घटना घडली होती. कर्नाटकात नरेंद्र मोदी यांच्या एका तरुणाने सुरक्षाकवच भेदून कारजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने सुरक्षाकवच भेदणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

Fitness Tips : घरबसल्या मिळवा जिमसारखा फिटनेस; फक्त ५ मिनिटांचा Workout

मोठी बातमी! चाकणकरांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदावर या महिला नेत्याची वर्णी, सुनेत्रा पवारांनी सोपवली सूत्रं

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

SCROLL FOR NEXT