RBI Saam Tv
देश विदेश

नोटांवरील महात्मा गांधीजींची प्रतिमा बदलणार?; आरबीआयने दिले स्पष्टीकरण

इतर राष्ट्रपुरुषांची प्रतिमा लावण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : काही दिवसापासून केंद्र सरकारकडून नोटांवर गांधीजींची प्रतिमा बदलून, इतर राष्ट्रपुरुषांची प्रतिमा लावण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सध्या देशभरात सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर अनेकांनी विविध नावं सुचवली असून, यासाठी लॉबिंग करायलाही सुरुवात केली असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता आरबीआयने (RBI) स्पष्टीकरण दिले आहे.

भारतीय चलनावर महात्मा गांधींजींचा फोटो आहे, पण आता यात आरबीआय (RBI) बदल करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याचे आरबीआयने खंडण केले आहे. सध्या महात्मा गांधींच्या प्रतिमेच्या जागी इतरांची प्रतिमा लावण्याची कोणताही असा प्रस्ताव नाही, असं आरबीआयने म्हटले आहे.

आरबीआय (RBI) डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर यांची प्रतिमा चलनी नोटांवर वापरण्याचा विचार करत असल्याचा दावा करण्यात आला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालयाने नोटांवर महात्मा गांधींव्यतिरिक्त इतरांची प्रतिमा लावण्याचा विचार करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अहवालात म्हटले आहे.

एका अहवालानुसार, सध्याच्या चलनात आणि बँकेच्या (Bank)नोटांमध्ये कुठलाही बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या आरबीआयकडे आलेला नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय चलनावर रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे छायाचित्र वापरण्याचा विचार करत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT