strong purchase of liquor Saam Tv News
देश विदेश

अन्न,वस्त्र, निवारा अन् दारु; देशात होतेय दारुची जोरदार खरेदी, कपडे खरेदीत घट, दारु खरेदीत वाढ

अन्न, वस्त्र आणि निवाराच नाही तर अनेकांसाठी दारु ही प्राथमिक गरज बनल्याची चर्चा आहे...कारण देशात कपडे खरेदीत घट तर दारु खरेदीत मात्र मोठी वाढ झालीय... पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Prashant Patil

स्नेहील झणके, साम टिव्ही

कर्मा चित्रपटात किशोर कुमारनं गायलेलं 'दे दारु... दे दारु' हे गाणं आज ही मद्यपीसाठी मोस्ट फेवरेट असं सध्या दिसतंय. त्याला कारणही अगदी तसंच आहे. सध्या लोक दारुवर दौलतजादा उडवत असल्याचं पाहायला मिळालंय.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा दारु खरेदी वाढली

2023-24 मध्ये कपड्यापेक्षा दारुवर अधिक खर्च

भारतीयांनी रचवली 1.20 लाख कोटींची दारु

देशात दारुवरील खर्चात 26 % वाढ

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आलीये. यावरून स्पष्ट होतं की, यंदा कपड्यांवरील खर्च कमी झाला आहे, तर दारुवरील खर्च 26 टक्क्यांनी वाढलाय.

दारूची खरेदी

2023-24

कपड्यांवर खर्च 7.29 लाख कोटी

दारुवर खर्च 1.20 लाख कोटी

2022 - 23

कपड्यांवर खर्च 7.60 लाख कोटी

दारुवर खर्च 0. 95 लाख कोटी

हे आकडे धक्कादायक आहेत. कारण मागील वर्षांपेक्षा 2024 मध्ये कपड्यांवरचा खर्च 30 लाखांनी घटलाय. तर दारूवरचा खर्च 25 लाखांनी वाढलाय. यामुळे दारु खरेदीचे आकडे हे देशातील दारूड्यांची संख्या वाढवणारे आहेत. त्यामुळे ग्लास खाली ठेवा आणि दारुप्रेमाऐवजी देशप्रेमाला प्राधान्य द्या असं म्हणायची वेळ आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : दोन पाटलांमध्ये कलगीतुरा, सांगलीत राजकीय राडा; सभापती निवडणुकीआधीच डायलॉग हाणला, इतिहासच काढला

Virar Picnic Spot : हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र अन् उंच डोंगर; वीकेंडला फिरायला 'विरार'च बेस्ट, पाहा टॉप ५ डेस्टिनेशन्स

Maharashtra Live News Update: नांदेडच्या बिलोली तालुक्यातील चर्चेत असलेला तलवार बाबा साम टीव्हीवर

Crispy Bitter Gourd Pakoda: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत कारल्याची भजी, सोपी आहे रेसिपी

Satara : साताऱ्यात शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून संताप

SCROLL FOR NEXT