अमेरिकेत एका स्फोटकाच्या चाचणीनंतर 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप Twitter/@USNavy
देश विदेश

अमेरिकेत एका स्फोटकाच्या चाचणीनंतर 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

यूएस नौदल गेल्या अनेक दशकांपासून 'फुल शिप शॉक ट्रायल्स' करत आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमेरिकेच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर यूएस नौदलाने 'फुल शिप शॉक ट्रायल्स' पार पाडली. यावेळी युएसएस जेरलड आर. फोर्ड च्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी यूएस नेव्हीने 18,143-किलो स्फोटकांचा विस्फोट केला. या स्फोटानंतर यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार 3.9 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. या चाचणीनंतर, युद्धनौका आधुनिकीकरण, देखभाल आणि दुरुस्तीसाठी किनाऱ्यावर परत जाईल.

प्रथम श्रेणीतील विमानवाहू युद्धनौका लढाईच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कितपत मजबूत आहे, याची खात्री करण्यासाठी ही चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे प्रगत संगणक मॉडेलिंग पद्धती, चाचणी आणि विश्लेषण वापरुन डिझाइन करण्यात आले आहे. या शॉक ट्रायल्समुळे यूएस युद्धनौकाही युद्धाच्या वेळी किती मजबूत आणि बळकट आहे, याची सत्यता पडताळण्यात आली.

दरम्यान यूएस नौदल गेल्या अनेक दशकांपासून 'फुल शिप शॉक ट्रायल्स' करत आली आहे. यामध्ये 2016 मध्ये लिटोरल कॉम्बॅट शिप्स यूएसएस जॅक्सन (एलसीएस 6) आणि यूएसएस मिलवॉकी (एलसीएस 5) या दोन युद्धनौकांची तपासणी करण्यात आली. तर 2008 मध्ये सॅन अँटोनियो मध्ये यूएसएस मेसा वर्डे (एलपीडी 1) मध्येही एक चाचणी घेण्यात आली होती. तर 1990 मध्ये ही यूएसएस वॅप्स (एलएचडी 1) आणि 1987 मध्ये मार्गदर्शित क्षेपणास्त्र क्रूझर यूएसएस मोबाइल बे (सीजी 53) आणि त्याच वर्षी यूएसएस थियोडोर रुझवेल्ट (सीव्हीएन 71) या युद्धनौकांचीही फुल शिप शॉक ट्रायल्स घेण्यात आली आहे.

यूएस नौदल राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण अधिनियम 9072.2 नुसार ऑपरेशन इंस्ट्रक्शन चीफच्या मार्गदर्शनाखाली या शॉक चाचण्या घेत आहे. त्याचबरोबर चाचणीत भाग घेणार्‍या सैन्य आणि नागरी कर्मचार्‍यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी नौदलाच्या वतीने संपूर्ण एफएसएसटीमध्ये विस्तृत प्रोटोकॉल तयार करण्यात आले आहेत. फोर्ड हे अमेरिकेच्या नौदलातील सर्वात नवीन आणि अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौका आहे. एप्रिलमध्ये फोर्डने 18 महिन्यांच्या पोस्ट डिलिव्हरी टेस्ट आणि चाचण्यांचा यशस्वी कालावधी पूर्ण केला. त्या दरम्यान क्रूने सर्व आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या. नियोजनबद्ध सुधारणा आणि वेळापत्रकानुसार देखभाल दुरुस्ती केली आणि फोर्ड-क्लास सिस्टमची विश्वासार्हता वाढविण्यासाठी अनेक चाचण्या यशस्वी पद्धतीने पार पाडल्या आहेत.

Edited By- Anuradha Dhawde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT