India Pakistan Tension: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढलाय.. भारत पाक युद्ध कुठल्याही क्षणी भडकण्याची शक्यता आहे.. त्यातच आता पाकिस्तानी नेत्यांकडून खुलेआम अणुयुद्धाच्या वल्गना केल्या जात आहेत. भारत पाक युद्ध भडकल्यास बलाढ्य भारतापुढे पाकचा निभाव लागणं शक्यच नाही.. त्यामुळेच पराभवाच्या भीतीने घाबरलेला पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करु शकतो, असा दावा पाकिस्तानी पत्रकारांकडून केला जातोय.. त्यामुळेच पाकचा माज मोडण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या साठ्यांवर ताबा मारण्याचा सिक्रेट प्लॅन आखलाय...
पाकच्या अणुबॉम्बवर अमेरिका करणार कब्जा?
अणुयुद्ध भडकल्यास अमेरिका पाकचे अणूबॉम्ब सीज करणार
पाक भारतावर अणुबॉम्ब डागण्याची शक्यता वाटल्यास अमेरिका पाकचा अणुबॉम्बचा साठा ताब्यात घेणार
पाकच्या अणुसाठ्यांवर दहशतवादी हल्ला झाल्यास अमेरिका अणुबॉम्ब ताब्यात घेणार
पाकची सत्ता दहशतवाद्यांच्या आका कडे गेल्यास अमेरिका अणुबॉम्ब जप्त करणार
पाकमध्ये सत्तांतर किंवा मार्शल लॉ लागू झाल्यास अमेरिका अणुसाठे ताब्यात घेणार
खरंतर उंदरासारखा घाबरलेला पाकिस्तान कितीही अणुबॉम्ब हल्ले करण्याचे इशारे देत असला तरी पाकचा कुठलंही मिसाईल भारतीय हद्दच पार करु शकत नाही.. कारण भारताकडे साध्या मिसाईलपासून ते पाकच्या अब्दाली, गझनवी, शाहीन, गौरी आणि अबाबील या अण्वस्त्र सज्ज मिसाईलला नष्ट कऱण्याची डिस्ट्रॉयर यंत्रणा आहे.
भारताकडे बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स यंत्रणा
प्रिथ्वी एअर डिफेन्स पाकच्या अणुबॉम्बला नष्ट करण्यास सक्षम
अॅडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम 5 हजार किमीपर्यंत हवेतच मिसाईल नष्ट करणार
S-400 ट्रायम्फ हे पाकचे अणुबॉम्ब हवेतच नष्ट करु शकतं
आकाश आणि बराक-8 मिसाईल सिस्टीमद्वारे पाकचे मिसाईल नष्ट करण्याची क्षमता
भारत फक्त सीमेवरच अणूहल्ले रोखू शकत नाही तर अग्नी-5, ब्रम्होस सारखे मिसाईल पाकचे अणुसाठे उडवून धमाका करु शकतात. एवढंच नाही तर अमेरिकेने पाकचे अणुबॉम्ब ताब्यात घेण्याची योजना आखलीय. हा भारताचा पाकिस्तानवर राजनैतिक स्ट्राईक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.