नवी दिल्ली: माजी IPS अधिकारी किरण बेदी (Kiran Bedi) यांनी पीएम मोदींच्या सुरक्षा भंगप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. किरण बेदी यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी हा पूर्वनियोजित कट होता. असा सवाल उपस्थित करत त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात राज्याचे डीजीपी घटनास्थळी नव्हते. यासोबतच राज्याचे गृहमंत्री आणि गृहसचिवही उपस्थित नव्हते. यावेळी डीएमही तिथे नव्हते. किरण बेदी म्हणाल्या सुरक्षेतील त्रुटी हा पूर्वनियोजित कट होता. त्या थेट म्हणाल्या की, हे स्पष्ट दिसते की हा पंतप्रधानांच्या हत्येचा प्लॅन होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) बुधवारी सकाळी 11.30 वाजता भटिंडा एअरबेसवर पोहोचले. खराब हवामानामुळे येथे 20 मिनिटे थांबले. त्यानंतर ते रस्त्याने राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे निघाले. त्यांना 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागणार होता. पंजाबच्या (Panjab) डीजीपींनी आश्वासन दिल्यावर पंतप्रधानांचा ताफा पुढे सरकला. त्यांचा ताफा हुसैनीवाला येथील हुतात्मा स्मारकापूर्वी 30 किमी अंतरावर उड्डाणपुलावर पोहोचला, जिथे आंदोलकांनी रस्ता अडवला. मोदी 15-20 मिनिटे येथे अडकले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक आहे. या प्रकरणाने लगेच जोर धरला आहे.
केंद्रीय पथकाकडून पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी
गृह मंत्रालयाच्या पथकाने पंतप्रधानांच्या सुरक्षेत कमी पडल्यामुळे चौकशी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाचे सचिव सुधीर कुमार सक्सेना यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये आयबीचे सहसंचालक बलबीर सिंग आणि एसपीजीचे आयजी एस सुरेश यांचा समावेश आहे. हे पथक शुक्रवारी फिरोजपूरला पोहोचले. टीमने एडीजीपी सायबर क्राईम नागेश्वर राव यांची ५० मिनिटे चौकशी केली.
ही टीम फिरोजपूरच्या प्यारायना गावातील उड्डाणपुलावरही पोहोचली जिथे बुधवारी शेतकऱ्यांनी पंतप्रधानांचा ताफा अडवला होता. सुमारे 40 मिनिटे चाललेल्या या तपासणीत अधिकाऱ्यांनी उड्डाणपुलाचे ते भाग तपासले जेथून शेतकरी मुख्य रस्त्यावर चढले. केंद्रीय पथकाने बीएसएफ मुख्यालयात फिरोजपूर, मोगा, भटिंडा आणि फरीदकोट येथील पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केली. बुधवारी कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.