Crime : मुलीला मारलं म्हणून वडिलांनी केला शाळेत गोळीबार; एक जखमी Saam Tv
देश विदेश

School: मुलीला मारलं म्हणून वडिलांनी केला शाळेत गोळीबार; एक जखमी

मुलीला रडताना पाहिल्याने संतापलेले वडिल आपली परवाना असलेली बंदूक घेऊन शाळेत गेल्यावरती त्यांचा सुरेंद्र सिंह शाळा संचालक यांच्याशी त्यांचा वाद झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शाळेमध्ये मुलांना शिक्षकांकडून (Teacher) मिळणारी शिक्षा (Punishment) ही आपल्यासाठी सर्वसामान्य बाब असते कारण मुळात शिक्षक मुलांना सुधारण्यासाठी त्यांनी शिक्षणात प्रगती करावी या हेतूनेच त्यांना शिक्षा करत असतात. मात्र आपल्या मुलीला शाळेत शिक्षकांनी शिक्षा केली म्हणून एका मुलीच्या वडिलांनी चक्क शाळेमध्ये गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शाळेत गोळीबार (Firing) केल्याची ही घटना राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूर येथे घडली आहे. भरतपूर जिल्ह्यातील कनवाडा येथील एका जवान बापाने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या जवानाचे नाव पप्पु गुर्जर असे असून पप्पुची मुलगी गावाततील सुरेंद्र सिंह नावाची व्यक्ती चालवत असणाऱ्या शाळेत शिकतं आहे. पप्पुच्या मुलीने घरी दिलेला अभ्यास न केल्याने तिच्या शाळेतील शिक्षिकेने तिला कानाखाली मारली आणि शिक्षिकेने मार दिल्याने ही मुलगी रडत घरी पोहोचली.

हे देखील पहा -

मुलीला रडताना पाहिल्याने पप्पू संतापला आणि तो आपली परवाना असलेली बंदूक घेऊन शाळेत गेल्यावरचती सुरेंद्र सिंह शाळा संचालक यांच्याशी त्याचा वाद झाला. आणि या वादामुळे चिडलेल्या मुलीच्या वडिलाने शाळेच्या (School) आवारातच गोळीबार केला. या गोळीबारामध्ये डबा घेऊन शाळेत आलेली सुरेंद्र यांची बायको राजबाला यांना गोळी लागली. सुरेंद्र यांच्या पत्नीला गोळी लागलेली पाहताच मुलीचा वडिल तेथून फरार झाला असून त्याचा शोध पोलिस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT