Madhya Pradesh Saam TV
देश विदेश

Madhya Pradesh : धक्कादायक! प्रेयसीसाठी बापाने पोटच्या मुलाची केली निर्घृण हत्या

साम टिव्ही ब्युरो

Madhya Pradesh: मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारी एक घटना घडली आहे. वडिलांनी आपल्या एकुलत्या एका मुलाची निर्घृण हत्या केली आहे. प्रेयसीच्या प्रेमात बाप इतका वेडा झाला की तिच्या सांगण्यावरून त्याने १५ वर्षीय मुलाचे हात तोडून गळा दाबत त्याची हत्या केली. पोलिसांनी नराधम पित्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने पित्याला प्रेयसीबरोबर अक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यामुळे त्याने एकुलत्या एका मुलाचा जीव घेतला. हरिओम चव्हान असे मृत मुलाचे नाव आहे. तर मोहनलाल असे हत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. ५ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. ६ डिसेंबर रोजी पोलिसांना झुडुपांमध्ये एका मुलाचा मृतदेह आढळला. मृतदेहावर कपडे नव्हते. तसेच कोपरापासून हात तुटले होते. विचित्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली. मृतदेहाचा तपास करताना गावकऱ्यांच्या मदतीने हा मृतदेह हरिओम चव्हानचा असल्याचे समजले.

पोलिसांनी (Police) मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तेव्हा समजले की, मुलाचे हात कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने तोडण्यात आलेत. तसेच त्याचा गळा दाबुन हत्या करण्यात आली आहे. या नंतर मुलाची हत्या नेमकी कोणी केली याचा तपास सुरु झाला. यासाठी पोलिसांनी कुटुंबातील सर्व सदस्यांची चौकशी केली. तसेच कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) देखील तपासले. या तपासात ही हत्या मुलाच्या वडिलांनी केल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी तात्काळ मोहनलाल आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय मोहनलालचे बांद्रा येथे राहणाऱ्या चुलत भावाच्या पत्नीबरोबर अनैतीक संबंध होते. हरिओमने डिसेंबर महिन्यात एका रात्री या दोघांना एकत्र चुकीच्या अवस्थेत पाहिले होते. तेव्हा पासून प्रेयसीने मोहनलालची हत्या करण्याचा तगादा लावला होता. जर मुलाला संपवले नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी तिने दिली होती.

त्यामुळे पित्याने मुलाची निर्घृण हत्या केली. यात त्याने आधी मुलाचा गळा दाबला त्यानंतर गळ्याला फास लावत घराच्या छतावरून खाली लटकवले. यात मुलाच्या पोटात एक सळी घुसली. त्यानंतर नराधम बापाने मुलाचे दोन्ही हात तोडले. कोणालाही याबद्दल समजूनये म्हणून त्याने मुलाचे हात बोरवेलमध्ये फेकून दिले आणि शव शेतात असलेल्या झुडुपांमध्ये टाकले. मोहनलाल आणि त्याची प्रेयसी या दोघांनाही कठोर शिक्षा होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Tourism : शाळेला सुट्टी पडली; लाडक्या मुलांसोबत प्लान करा फॅमिली ट्रिप, फिरा ठाण्यातील 'ही' २ सुंदर हिल स्टेशन्स

Jaljeera Benefits: उन्हळ्यात थंडगार जलजीरा प्यायल्याने शरीराला मिळतात हे ७ फायदे

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत तुमरकोठी गाव उजळलं; पोलीस दलाच्या प्रयत्नांनी वीज सेवा सुरू

APY Scheme: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! २ कप चहाचे पैसे वाचवा अन् ₹५००० पेन्शन मिळवा

MLC Election: जय पवारांना विधान परिषदेत पाठवा! आमदार मिटकरींचं सुनेत्रा पवारांना पत्र

SCROLL FOR NEXT