अबब ! नवरीने लग्नात एवढं सोनं घातलं की...  Saam Tv
देश विदेश

अबब ! नवरीने लग्नात एवढं सोनं घातलं की...

चीन मधील एक नवरी सोशल मीडियावर चांगलीच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : चीन मधील एक नवरी सोशल मीडियावर चांगलीच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या नवरीने लग्नाच्या दिवशी तब्बल 60 किलो सोने अंगावर घातले आहे. हुबेई प्रांतात राहणाऱ्या या नवरीला बघून सारेच पाहत राहिले होते. 30 सप्टेंबर दिवशी आपल्या लग्नात भारी भक्कम दागिने घातल्यामुळे त्या नवरीला चालता देखील येत नव्हते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे देखील पहा-

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नवरी लग्नाचा सफेद ड्रेस आणि हातात गुलाबांचा गुच्छ पकडलेला दिसत आहे. दागिन्यांचे वजन इतके होते की, त्या नवरीला चालणे देखील मुश्किल झाले आहे. ती चालण्याकरिता नवऱ्याची मदत घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवरीला हे दागिने नवऱ्याने हुंडा म्हणून दिले होते. नवऱ्याने तिला सोन्याचे नेकलेस दिले ज्याचे वजन 1 किलोग्रॅम होते. नेकलेस व्यतिरिक्त हातामध्ये भरभक्कम बांगड्या देखील आहेत. तिच्या बांगड्या तिला कुटुंबाने भेट म्हणून दिले होते, असेही सांगितले जाते की नवऱ्याचे कुटुंब खूप श्रीमंत आहे.

अनेकदा लोक दिखावा म्हणून सोन्याचे दागिने घालत आहेत. मात्र, या नवरीने घातलेले दागिने बघून अनेकांना तिच्यावर दया येत आहे. लग्नात आलेल्या पाहुण्यांनी नवरीने मदतीसाठी विचारले मात्र, तिने हसत त्यांना नकार दिला आहे. स्थानिक लोकांसाठी सोने म्हणजे गुडलकचे प्रतीक आहे. येथील लोकांसाठी सोने म्हणजे वैभव आणि श्रीमंतीचे लक्षणे असतात. वाईट आत्म्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी देखील या ठिकाणी सोन्याचा वापर केला जातो.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नवाब मलिक रिंगणात, महायुतीत वाद; भाजप प्रचार करणार नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT