Talminadu CM Thalapathy Vijay Saam Tv
देश विदेश

Tamil Nadu New CM: मोठी बातमी! तमिळनाडूमध्ये आकड्यांचे गणित जुळलं, उद्या होणार नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी

Tamil Nadu CM Thalapathy Vijay: तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. थलपती विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री होणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.

Priya More

Summary:

  • थलपती विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री होणार

  • थलपती विजय उद्या सकाळी ११ वाजता शपथ घेणार

  • टीव्हीके पक्षाला बहुमताचा आकडा पार करण्यात यश

तामिळनाडूमध्ये नवीन सरकार स्थापनेबाबतचा तिढा अखेर सुटला. टीव्हीकेचे प्रमुख थलपती विजय यांनी आज तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. थलपती विजय हे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. ते उद्या सकाळी ११ वाजता शपथ घेतील. त्यामुळे तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

थलपती विजय यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा करत आज राज्यपालांकडे ११८ आमदारांनी पाठिंबा दिल्याचे पत्रे सादर केली. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने १०८ जागा जिंकल्या. त्यापैकी दोन जागा थलपथी विजय यांनी जिंकल्या आहेत. आता विजय यांना एक जागा सोडावी लागेल. अशा परिस्थितीत फक्त १०७ टीव्हीके आमदारांची मते मोजली जाणार आहेत. याशिवाय थलपथी विजय यांना २ आययूएमएल, २ सीपीआय, २ सीपीएम, २ व्हीसीके आणि ५ काँग्रेस आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे.

२३४ विधानसभेच्या जागा असलेल्या तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ११८ आहे. थलपती विजय यांच्याकडे आमदारांचा आकडा १०७ चा आहे. आता त्यांना आययूएमएल, सीपीआय, सीपीएम, व्हीसीके आणि काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दिला. थलपती विजय यांना आवश्यक असणाऱ्या बहुमतापेक्षा जास्त म्हणजे १२१ आमदारांचा पाठिंबा मिळाला.

बहुमताच्या आकड्यांचे गणित जुळल्यानंतर थलपती विजय यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला. ते आता उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये थलपती विजय उद्या सकाळी ११ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या स्टेडियमवर शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. या सोहळ्याची जबाबदारी ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनने घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: दररोज किती मिनिटं चालल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो?

Maharashtra News Live Update: रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; आमदार, खासदारांकडून तातडीने सर्व दौरे रद्द

Rajbhog Recipe: घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरी बनवा टेस्टी राजभोज, वाचा सोपी रेसिपी

Kalyan News: मुस्लिमांना घर नाकारल्याचा आरोप; एमआयएम नेत्याची थेट पोलिसांत धाव, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT