Tesla Car Saam Tv
देश विदेश

बेदर'कार'! सुस्साट टेस्ला कारची रस्त्यात येईल त्याला धडक, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

टेस्लाने सांगितले की, कार वेगात जात असताना कारचे ब्रेक लाइट चालू नव्हते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tesla Car Accident: टेस्ला कारच्या अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चीनमधील हा अपघाताचा व्हिडीओ आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. टेस्लाची मॉडेल Y कारचा अपघात (Car Accident) व्हिडिओमध्ये दिसत आहे. कारचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र टेस्लाने हे आरोप फेटाळले आहेत.

टेस्लाने सांगितले की, कार वेगात जात असताना कारचे ब्रेक लाइट चालू नव्हते. कारमधील डेटा दाखवतो की ब्रेकवर पाऊल ठेवल्याचं दिसून येत नाही. मात्र, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. हा व्हिडिओ Reddit वर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये चीनच्या ग्वांगडोंगमधील अरुंद रस्त्यांवर प्रचंड वेगाने धावताना दिसत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 5 नोव्हेंबर रोजी दक्षिणेकडील प्रांत ग्वांगडोंगमध्ये घडली आहे. ज्यामध्ये दुचाकीस्वार आणि हायस्कूलचा विद्यार्थी ठार झाला. व्हिडीओमध्ये टेस्ला कार वेगाने धावताना दिसत आहे. कार पूर्णपणे अनियंत्रित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावर समोर येईल त्याला धडक देत कार पुढे जात आहे. वाहनांना धडकल्यानंतर कार एका इमारती जाऊन धडकली आणि थांबली.

सध्या चीनमधील पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेनंतर चीनच्या बाजारपेठेत टेस्लाची प्रतिमा डागाळली जाऊ शकते. अमेरिकेची ईव्ही निर्माता टेस्ला या प्रकरणाच्या तपासात मदत करत आहे. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

चीनमध्ये याआधीच टेस्ला कारचे ब्रेक फेल झाल्याचा दावे समोर आले आहेत. गेल्या वर्षी, शांघाय ऑटो शोमध्ये एका ग्राहकाने खराब ब्रेकबद्दल तक्रार केली आणि सोशल मीडियावर पोस्ट करत तक्रार केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT