Jammu-kashmir  X Twitter
देश विदेश

Jammu-kashmir: श्रीनगरमध्ये टार्गेट किलिंग; दहशतवाद्याकडून पंजाबमधील एका व्यक्तीची हत्या,सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू

Terrorist Attack : काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “दहशतवाद्यांनी शहीद गंज श्रीनगरमध्ये परप्रांतीय अमृतपाल सिंग गोळीबार केला. अमृतपाल हे अमृतसरचे रहिवासी होते. तर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Bharat Jadhav

Terrorist kills Punjab Resident In Srinagar :

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडलीय. यात पंजाबमधील एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर एकजण जखमी झालाय. काश्मीर झोन पोलिसांनी X वर पोस्ट करत याची माहिती दिलीय. दहशतवाद्यांनी अमृतसर पंजाब येथील अमृतपाल सिंग नावाच्या व्यक्तीवर गोळी झाडत त्याची हत्या केल्याची माहिती त्यांनी एक्सवर दिलीय. (Latest News)

जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत असल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी दिलीय. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, जुन्या श्रीनगर शहरातील शलाकडल भागात दहशतवाद्यांनी दोन लोकांवर हल्ला केला. यातील एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झालाय.

काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार “दहशतवाद्यांनी शहीद गंज श्रीनगरमध्ये परप्रांतीय अमृतपाल सिंग गोळीबार केला. अमृतपाल हे अमृतसरचे रहिवासी होते. तर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झालाय. त्याला उपचारासाठी नेण्यात आले आहे. दरम्यान सुरक्षा दलाने परिसराची नाकेबंदी केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. या क्रूर घटनेने त्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना आहेत. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी)ही हा हल्ला भ्याडपणाचा असल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये स्थानिक नसलेल्या नागरिकावर दहशतवाद्यांनी केलेला हा पहिलाच हल्ला आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला दहशतवाद्यांनी अनंतनाग आणि शोपियान जिल्ह्यात गैर-स्थानिक लोकांना लक्ष्य केले होते. तर भाजपचे प्रवक्ते रणबीर सिंग पठानिया म्हणाले की, जम्मू-काश्मीर शांतता आणि न्यायाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तेव्हा , शेजारील देश काश्मीरमधील शांतता बिघडवण्यासाठी वेळोवेळी टार्गेट किलिंगचे मोड्यूल वापरत असल्याचं म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT