Kabul Attack Saam TV
देश विदेश

Kabul Attack: अफगाणिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरलं, चीनी हॉटेल लक्ष्य; मुंबईवरील 26/11 हल्ल्याची झाली आठवण

कोणत्याही दहशतवादी संघटनेने अजूनतरी या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही.

साम टिव्ही ब्युरो

Kabul Hotel Attack: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी एका चिनी हॉटेलला टार्गेट केलं आहे. दहशतवाद्यांनी हॉटेलजवळ गोळीबार केला आणि मोठा ब्लास्टही केल्याचं समोर आलं आहे. या हल्लाने मुंबईवरील 26/11 हल्ल्याची आठवण झाली आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एकाने AFP वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर गोळीबार करत हॉटेलमध्ये शिरले. यावेळी त्यांनी ब्लास्ट देखील केले. ज्या हॉटेलमध्ये हा हल्ला झाला आहे तिथे चीनी अधिकारी वारंवार येत असतात. हा हल्ला कुणी केला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अजूनतरी या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही.

काबूलमधील या हॉटेलमध्ये चीनी व्यापारी आणि अधिकारी यांची वारंवार ये-जा सुरु असते. त्यामुळे या हॉटेलला चीनी हॉटेल देखील म्हटलं जातं.

घटनास्थळावरील व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीचे लोट बाहेर येताना दिसत आहे. हल्ल्यानंतर घटनास्थळी जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदणी मठाच्या जागेत माधुरी हत्तीनीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने २० दिवसांत सादर करण्याचे आदेश

Crime: दिवाळीत रक्तरंजित थरार! घरगुती वादातून चाकूने सपासप वार; एकाचा जागीच मृत्यू तर चौघे गंभीर

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमच्या पायांमध्ये दिसतात 'हे' मोठे बदल; मृत्यूचा धोका टाळण्यासाठी लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra Politics: दिवाळीत भाजपने बॉम्ब फोडला, शिवसेनेला खिंडार; आजी-माजी सरपंचांसह पदाधिकाऱ्यांनी कमळ घेतलं हाती

Maharashtra Politics : सत्ताधारी आमदारांना विकासनिधी की खैरात; निवडणुका जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT