jammu Terror Attack Saam tv
देश विदेश

Jammu Terror Attack : मोठी बातमी! जम्मूमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला?

jammu Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या नरगोटामध्ये शस्त्रसंधीदरम्यान दहशतवादी हल्ला केल्याचे समोर येत आहे. या दहशतवाद्यांनी लष्करी तुकडीला लक्ष्य केलं आहे.

Vishal Gangurde

जम्मू-काश्मीरच्या नरगोटामध्ये शस्त्रसंधीदरम्यान दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. लष्करी तुकडीवर हल्ला झाला आहे. हल्ल्याची माहिती मिळताच सेना आणि पोलीस दलाचे जवान घटना स्थळी पोहोचले आहेत. दोघांनी घटनास्थळाला घेरलं आहे. जवानांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

युद्धविरामानंतर अवघ्या ३ तासांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानने एकूण ११ ठिकाणी उल्लंघन केलं. यादरम्यान जम्मू काश्मीरच्या नरगोटामध्ये दहशतवादी झाल्याचं वृत्त आलं. मात्र,काही वेळेनंतर दहशतवादी हल्ला झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. एनआय वृत्तसंस्थेने हल्ला झाल्याचा दावा फेटाळला. त्यानंतर या भागात संशयास्पद घटना घडल्याची माहिती दिली. आता सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने शोधाशोध सुरु केली आहे.

संशयितांकडून गोळीबार

दोन संशयितांनी गोळीबार करून पळ काढला. गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक सुरक्षा एजन्सीने घटनास्थळाला चारही बाजूने घेरलं. जवानांनी मोठ्या पातळीवर शोधाशोध सुरु केली. परंतु गोळीबार करणारे संशयित कोण होते, याची माहिती मिळू शकलेली नाही. त्यांचा गोळीबाराचा उद्देश समजू शकलेला नाही.

शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर काही तासांत पाकिस्तानचे नापाक इरादे समोर आले आहेत. शनिवारी रात्री घुसखोरांनी ड्रोन देखील पाठवले होते. परंतु भारताचे त्यांचे इरादे हाणून पाडले. भारतीय जवानांनी शंस्त्रसंधी उल्लंघनाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र, पाकिस्तानकडून शस्त्रसंधी झाल्याचा दावा भारतीय सैन्याने फेटाळून लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT