देश विदेश

Telangana tunnel collapse: बोगद्याचं काम सुरू असताना मोठी दुर्घटना, २४ तासांपासून ८ जण अडकले, NDRF म्हणाले आवाज दिला पण...

Telangana : तेलंगणाच्या नागरकुरनूल जिल्ह्यातील डोमलापेंटा येथे एसएलबीसी बोगद्यात अपघात झाला, ज्यात वरिष्ठ अभियंत्यासह आठ कामगार अडकले. पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांना मदतीचा आश्वासन दिले.

Dhanshri Shintre

तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यातील डोमलापेंटा येथे एसएलबीसी बोगद्यात मोठा अपघात घडला आहे, ज्यात एका वरिष्ठ अभियंत्यासह आठ कामगार अडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचा आश्वासन दिला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना बचावकार्य वेळेत आणि सुरळीत पार पडावे, असे निर्देश दिले. माहितीनुसार, बोगद्याच्या कामादरम्यान अचानक पाणी आणि चिखलाचा लोट वाहून आल्याने बोगद्याचा काही भाग खचला, त्यामुळे ८ किलोमीटरचा खड्डा तयार झाला. जेपी असोसिएट्स आणि रॉबिन कंपनीने सांगितले की, सकाळी ८ वाजता काम सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांतच हा अपघात घडला.

बोगद्याच्या खचण्यापूर्वी मोठा आवाज झाला, नंतर पाणी आणि चिखल वेगाने बोगद्यात शिरला, ज्यामुळे कामगारांना पळून जाऊन सुरक्षितस्थळी जाण्याची भाग पडली. टीबीएमजवळ असलेले कामगार सुरक्षित बाहेर पडले, पण बोगद्याच्या पुढील भागात काम करणारे ८ कामगार अडकले. खोदकाम लगेच थांबवून बचावकार्य सुरू करण्यात आले, आणि अडकलेले कामगार बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या बचावकार्य जोरात सुरू असून, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

अडकलेल्या कामगारांसाठी सुसज्ज व्यवस्था चालू ठेवली गेली आहे, आणि त्यांना ऑक्सिजन पुरवठा कायम ठेवण्यात आला आहे. रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय पथके घटनास्थळी पूर्ण तयारीत तैनात आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टर देखील सज्ज आहेत, आणि त्यांचे उपचार कार्य सुरू आहे. सर्व प्रकारच्या मदतीसाठी आवश्यक व्यवस्था सुनिश्चित केली गेली आहे.

राज्यमंत्री कॅप्टन एन उत्तम कुमार रेड्डी यांनी राज्य सरकारच्या सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करण्यात येत असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले की, संकटाशी सामना करण्यासाठी NDRF आणि भारतीय लष्कराच्या तज्ज्ञ पथकांची तैनाती करण्यात आली आहे, आणि बचाव कार्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT