पाण्यावर तरंगणारं जहाज, बोट किंवा सबमरीन तुम्ही पाहिलेच असेल. पण कधी पाण्यावर तरंगणारं संपूर्ण शहर कधी पाहिलंय का?
सौदी अरेबियामध्ये लवकरच कासवाच्या आकाराचं आणि पाण्यावर तरंगणारं Pangeos terayacht शहर उभारलं जाणार आहे.
१८०० फूट लांब आणि २००० फूट रुंद असलेल्या या तरंगणाऱ्या terayacht शहरात मॉल, बीच क्लबसारख्या सुविधांसोबत एकाच वेळी तब्बल ६०००० लोकं आरामात राहू शकतात.
या शहराचे संपूर्ण बांधकाम ८ वर्षांत पूर्ण करण्यासाठी ८ अब्जांचा खर्च अपेक्षित आहे.
यासाठी निधी जमला तर 2033 मध्ये काम सुरु होऊन आठ वर्षात हे यॉट तयार होऊ शकतं.
प्रसिद्ध डिझायनर लाझारिनीची (Lazzarini) ही संकल्पना आहे.
ज्यामध्ये विविध हॉटेल्स, शॉपिंग सेंटर्स, उद्याने, जहाज आणि विमानतळं देखील असेल. इथं राहण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व सुविधांचा देखील समावेश आहे.
एवढी मोठं तरंगतं शहर तयार करण्यासाठी डिझायनर्सना विशेष जागेची आवश्यकता असेल. सौदी अरेबियामध्ये यासाठी किंग अब्दुल्ला बंदर प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सुमारे एक चौरस किलोमीटर समुद्रात गोलाकार धरण बांधावे लागणार आहे.
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पॅन्जिओज टेरायाचबद्दल प्रचंड उत्सुकता व्यक्त केली आहे. पॅन्जिओज टेरायाच कसं दिसेल हे पाहण्यासाठी तुम्ही त्यांच्या YouTube वर Lazzarini ने पोस्ट केलेला व्हिडिओ देखील पाहू शकता.
मात्र, पॅन्जिओज टेरायाचबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. ते समुद्राच्या लाटांना कसे हाताळेल असा प्रश्न लोकांना पडला आहे. जरी हे एक सुंदर डिझाइन आहे परंतु व्यावहारिक दिसत नाही असं लोकं म्हणतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.