Telugu Anchor death news Saam tv news
देश विदेश

TV Anchor Death: महिला न्यूज अँकरचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला; वडिलांच्या तक्रारीनं गूढ वाढलं

Hyderabad Journalist Death: हैदराबादमध्ये प्रसिद्ध तेलुगू अँकर स्वेच्छा वोटारकर यांचा संशयास्पद मृत्यू. आत्महत्येचा गुन्हा दाखल. वडिलांनी एका व्यक्तीवर मानसिक त्रासाचा आरोप करत एफआयआर दाखल केली.

Bhagyashree Kamble

हैदराबादमधील आघाडीच्या तेलुगू वृत्तवाहिनीच्या महिला अँकरचा राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. शुक्रवारी रात्री महिला पत्रकाराने पंख्याला लटकून आयुष्य संपवलं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महिला पत्रकाराच्या वडिलांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आली. त्यांनी मुलीच्या आत्महत्येसाठी एका व्यक्तीला जबाबदार धरले आहे, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

स्वेच्छा वोटारकर (वय वर्ष ४०) असे महिला पत्रकाराचे नाव आहे. शुक्रवारी रात्री उशिरा तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. स्वेच्छाच्या वडिलांना मुलीने आत्महत्या केली असल्याचं कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. एका व्यक्तीवर त्यांचा संशय आहे. त्या व्यक्तीने आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे मुलीने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगितलं.

भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांनी महिला पत्रकाराच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत पोस्ट शेअर केली आहे. 'स्वेच्छा वोटारकर यांच्या दुर्देवी निधनाचे वृत्त ऐकताच दु:ख झाले. ती एक निर्भय पत्रकार आणि लेखिका होती. माझ्याकडे बोलण्यासाठी आता शब्द नाहीत', असं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला.

केटी रामाराव पोस्टमध्ये म्हणाले, 'माझी ही पोस्ट वाचणाऱ्यांनो, जर तुम्हाला जीवन जगणं कठीण वाटत असेल तर, कृपया प्रोफेशनलशी संपर्क साधा. तसेच त्यांच्याकडून मदत घ्या. मदतीसाठी संकोच करू नका. जीवन जगण्यासाठी आहे, आपल्या अवती भोवती आधार असतो. आत्महत्या हा एकमेव पर्याय नसतो', असं म्हणत त्यांनी सल्ला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

Bin Lagnachi Goshta: जुन्या नात्यांची नवी इनींग; निवेदिता सराफ-गिरीश ओक यांची 'बिन लग्नाची गोष्ट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले; ७५% लोकांची पसंती|VIDEO

SCROLL FOR NEXT