Accident Saam Tv
देश विदेश

Accident: भरधाव कार दुभाजकाला आदळून थेट हवेत उडाली, समोरुन येणाऱ्या कारला धडकली; थरकाप उडवणारा VIDEO

Telangana Siddipet Highway Accident: तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यात महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Rohini Gudaghe

Highway Accident News

तेलंगणातील (Telangana) सिद्धीपेट जिल्ह्यात महामार्गावर एक भीषण अपघात (Accident News) झाला आहे. या अपघातात चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. हा भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना शनिवारी (24 फेब्रुवारी) घडली आहे. (Latest Accident News)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सिद्धीपेट येथील कुकुनूर पल्ली येथे राजीव महामार्गावर धावणाऱ्या एका वेगवान कारचं नियंत्रण सुटलं. ती कार दुभाजकाला धडकली, त्यानंतर ती रस्त्याच्या विरुद्ध बाजूने दुसऱ्या दिशेने येणाऱ्या दुसऱ्या कारला (Highway Accident) धडकली. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

या अपघाताचा व्हिडीओ (Accident CCTV Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक काळी गाडी दुभाजकाला आदळल्याचं दिसत आहे. दुभाजकाला आदळल्यानंतर गाडी हवेत उडाली. त्यानंतर ती दुभाजकाच्या पलीकडे जाऊन भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या गाडीला धडकली. दोन्ही गाड्या हवेत उडून खाली पडल्या. काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ आहे.

गाड्यांची ही धडक कॅमेऱ्यात कैद झाली (Highway Accident Video) आहे. ही धडक खूप जोरदार होती. दुभाजक ओलांडणाऱ्या कारला महामार्गावर वेगात येणाऱ्या दुसऱ्या कारने जोरदार धडक दिल्याचं दिसून येत आहे. या अपघातामुळे महामार्गावर थोडा वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

महामार्गावर भीषण अपघात

अपघातात दोन्ही गाड्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या अपघातात सुमारे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत (Car Accident) आहे. चार जखमींपैकी दोन जण गंभीर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही रस्त्यांच्या मधोमध कोणताही अडथळा नसल्याने कार पलटी झाल्याचं दिसतंय.

सरकार टोलच्या नावाखाली पैसे घेते आणि प्रवाशांना सुरक्षितता देण्यात अपयशी ठरते. रस्त्यावर गतिरोधक असता, तर एवढा मोठा अपघात टळला असता. भविष्यात असे अपघात होऊ नयेत. यासाठी सरकारने रस्ते सुरक्षा उपाययोजना वाढवायला हव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS धर्मांतर प्रकरण; संशयितांच्या जामीन अर्जावर आज येणार निकाल

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

SCROLL FOR NEXT