Telangana News Saam Tv News
देश विदेश

Inter-caste marriage: सैराटसारखा थरार! आंतरजातीय विवाहाला विरोध, प्रिन्स दादाने भाऊजीला संपवलं

Suryapet inter-caste marriage: आंतरजातीय विवाह केल्यामुळे तरूणीच्या भावाने तरूणाची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

आंतरजातीय विवाह केल्यामुळे तरुणीच्या भावाने तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना तेलंगणातील सूर्यपेट शहरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हत्येचे कारण आंतरजातीय प्रेमविवाह असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी, कृष्णा उर्फ बंटीने पिल्ललमर्री गावातील भार्गवीशी प्रेमविवाह केला होता. त्यांनी आपला संसार सूर्यापेट गावात थाटला होता. भार्गवीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. त्यांना वेगळे करण्याचे अनेक प्रयत्न तरूणीच्या कुटुंबाने केला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून भार्गवीच्या भावाने तरुणाची निर्घृण हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तलावाजवळ आढळला मृतदेह

घटनेच्या दिवशी, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास बंटीला त्याच्या मित्र महेशचा फोन आला होता. यानंतर त्याने पत्नीला कळवले आणि तो घराबाहेर निघाला होता. रात्री बंटी घरी परतला नाही. तेव्हा कुटुंबाला काळजी वाटू लागली. दुसर्‍या दिवशी पिल्ललमर्री तलावाजवळ त्याचा मृतदेह आढळला.

मृतदेहाची तपासणी केली असता, मानेवर खुणा आणि शरीरावर जखमा होत्या. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी करत गुन्हा दाखल केला आहे. डीएसपी रवी राणा यांनी सांगितले की, 'आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल'.

या घटनेबद्दल बंटीची पत्नी भार्गवी म्हणाली, 'आम्ही कुटुंबाच्या इच्छेविरोधात लग्न केलं आहे. परंतू आम्हाला आशा होती, वेळेनुसार सगळं काही ठीक होईल. पण तसं झालं नाही, वाटलं नव्हतं बंटीला मारतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT