Telangana Medical Student Saam Tv
देश विदेश

Telangana Medical Student : रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, हैदराबादमधील मन सुन्न करणारी घटना

ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Shivani Tichkule

Hyderabad Medical Student News : वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून तेलंगणातील हैदराबादच्या काकतिया मेडिकल कॉलेजमधील पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. धारावती प्रीती असे या विद्यार्थिचे नाव आहे. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तिने पाच दिवसांपूर्वी आपला सिनियर मोहम्मद सैफ याने रॅगिंग केल्यामुळे व्यथित होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी (२६ फेब्रुवारी) तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर सोमवारी (२७ फेब्रुवारी) तिच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

प्रीती हिच्यावर सोमवारी दुपारी जनगाव जिल्ह्यातील गिरणी ठांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रीतीच्या कुटुंबीयांनी मात्र वारंगल येथील एमजीएम रुग्णालयात (Hospital) 21 आणि 22 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तिची ड्युटी असताना तिच्यासोबत काय घडले हे अधिकाऱ्यांनी उघड करावे अशी मागणी केली.

प्रीतीची हत्या नसून आत्महत्या

प्रीतीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा तिचे वडील नरेंद्र यांनी केला आहे. त्यांच्या मुलीला कोणीतरी घातक इंजेक्शन दिल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. प्रीतीच्या वडिलांच्या तक्रारीवरून द्वितीय वर्षाचा विद्यार्थी मोहम्मद सैफ याला अटक (Arrest) करण्यात आली.

पण, महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनावर त्यांनी निष्काळजीपणाचा आरोप केला. त्यानंतर आता राज्यातले राजकारण तापले असून सोशल मीडियातूनही संताप व्यक्त केला जात आहे. प्रीतीला न्याय आणि दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणीतिच्या कुटुंबीयांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT