Stray Dogs Shot Saam TV
देश विदेश

Stray Dogs Shot: क्रूरतेचा कळस! २० भटक्या कुत्र्यांना गोळ्या घालून केलं ठार; तेलंगणामधील थरारक घटना

Telangana News: एका चारचाकीतून काही व्यक्ती खाली उतरल्या. त्यांच्या हातात बंदुका होत्या आणि त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. खाली उतरताच त्यांनी कुत्र्यांवर गोळीबार करण्यास सुवात केली.

Ruchika Jadhav

20 Stray Dogs Shot:

तेलंगणामध्ये पोलिसांना एकाच दिवशी अचानक २० भटके कुत्रे मृत अवस्थेत आढळून आलेत. एकाचवेळी २० कुत्र्यांचे मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महबूबनगरमधील अड्डाकल मंडळमधील पोन्नकल या गावात ही शक्रवारी ही घटना घडली आहे. घटनेची माहिती आधी प्राणीप्रेमींना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

भटक्या कुत्र्यांवर गोळीबार

पोलिसांना प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या महितीनुसार, एका चारचाकीतून काही व्यक्ती खाली उतरल्या. त्यांच्या हातात बंदुका होत्या आणि त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. खाली उतरताच त्यांनी कुत्र्यांवर गोळीबार करण्यास सुवात केली. त्यांनी तब्बल २० कुत्र्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. क्रूरपणे त्यांनी कुत्र्यांना संपवलं.

सदर घटनेमध्ये गोळीबारानंतर २० भटक्या कुत्र्यांचे मृतदेह सापडलेत. तर अनेक कुत्रे जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी कुत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सूरू आहेत.

बेंगळुरूमध्ये देखील अशीच एक विचित्र घटना घडलीये. येथे ११ मांजरींना विषबाधा झालीये. विषबाधा झाल्याने ११ मांजरींचा मृत्यू देखील झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

SCROLL FOR NEXT