Telangana Assembly Election 2023 Saam Tv
देश विदेश

Telangana Assembly Election : 'ते स्वत: श्रीमंत झाले, तेलंगणातील गरीब आणखी गरीब झाले', प्रियांका गांधींचा BRS वर हल्लाबोल

Telangana Assembly Election 2023 : सध्या सर्वच राजकीय पक्ष तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. यातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीही सोमवारी तेलंगणातील यादद्री भोंगीर जिल्ह्यात पोहोचल्या. येथे त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.

Satish Kengar

Telangana Assembly Election 2023 :

सध्या सर्वच राजकीय पक्ष तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. यातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीही सोमवारी तेलंगणातील यादद्री भोंगीर जिल्ह्यात पोहोचल्या. येथे त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.

यादरम्यान प्रियंक गांधी यांनी भारत राष्ट्र समितीवर (BRS) जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाले की, बीआरएस श्रीमंत झाला आहे, पण तेलंगणातील गरीब लोक आणखी गरीब झाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवडणूक सभेला संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी बीआरएसवर हल्लाबोल केला. प्रियंका गांधी म्हणाल्या की, बीआरएस श्रीमंत झाला आहे, पण तेलंगणातील गरीब लोक आणखी गरीब झाले आहेत. निवडणुकीच्या वेळी हे पक्ष निवडणुका मॅनेज करतात पण लोकांनी त्यानं सांगायला हवं ते विकाऊ नाहीत.  (Latest Marathi News)

यासोबतच त्या म्हणाली की, मी तेलंगणातील लोकांना बीआरएस दाखवून देण्याचे आवाहन करते की, ते त्यांच्या हक्कांसाठी यापूर्वीही लढले होते आणि ते आताही लढू शकतात.

'भाजप 10 वर्षात सर्वात श्रीमंत पक्ष बनला'

यासोबतच प्रियंका गांधी यांनी भाजप लक्ष्य करत दावा केला की, गेल्या 10 वर्षात भाजप जगातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला आणि त्याने देशाची संपत्ती आपल्या बड्या उद्योगपती मित्रांच्या हाती दिली.

त्या म्हणाले की, आता बीआरएस तेलंगणातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला आहे. त्यांचे भ्रष्ट नेते त्यांच्या महालात राहतात. ते लोक सर्वसामान्यांना भेटत नाहीत. बीआरएस नेते राजवाड्यांमध्ये आणि फार्महाऊसमध्ये बसून सरकार चालवत आहेत. त्या म्हणाले की, सरकारची धोरणे केवळ श्रीमंत व्यवसायांना लाभ देण्यासाठी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT