Telangana Nagarkurnool 16 Years Old Girl Preganancy Saam Tv
देश विदेश

Shcoking : धक्कादायक! १६ वर्षीय मुलीकडून बाळाला जन्म; अर्भक कचऱ्याच्या डब्यात टाकून काढला पळ

Telangana Nagarkurnool News : तेलंगणात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने स्कॅनिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये बाळाला जन्म दिला, त्यानंतर नवजात बाळाला कचऱ्याच्या डब्यात टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • तेलंगणात १६ वर्षीय विद्यार्थिनीने बाळाला दिला जन्म

  • नवजात बाळ स्कॅनिंग सेंटरच्या बाथरूममधील कचऱ्याच्या डब्यात सापडले

  • पोलिसांनी आई व बाळाला रुग्णालयात दाखल केले

  • मुलगी गर्भवती कशी झाली याचा पोलिसांकडून तपास सुरू

Telangana Nagarkurnool 16 Years Old Girl Preganancy तेलंगणात तब्बल १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे यानंतर या मुलीने नवजात बाळाला कचऱ्याच्या डब्ब्यात टाकून आईसह पळ काढला. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत गुन्हा दाखल करत आई आणि बाळाला रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यात सदर घटना घडली आहे. संबंधित मुलगी जिल्ह्यातील एका नामंकित शाळेतील इंटरमिजिएटची विद्यार्थिनी होती. ती पहिल्या वर्षात शिकत होती. सोमवारी ती शाळेत परीक्षेसाठी गेली होती. यादरम्यान तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या. तिच्या आईने तिला नागरकुरनूल शहरातील एका रुग्णालयात नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी स्कॅन करण्याचा सल्ला दिला आणि जवळच्या निदान केंद्रात जाण्यास सांगितले.

स्कॅनिंग सेंटरमध्ये वाट पाहत असताना मुलगी वॉशरूममध्ये गेली, जिथे तिला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिने बाळाला जन्म दिला. यानंतर साफसफाई कर्मचाऱ्यांना बाथरूममध्ये कचऱ्याच्या डब्यात नवजात बाळ दिसले आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलगी आणि नवजात बाळाला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी सांगितले की आई आणि बाळ दोघेही सध्या सुरक्षित आहेत आणि त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख आहे.

पोलीस तपासादरम्यान मुलीने आणि तिच्या आईने कर्मचार्‍यांच्या लक्षात येण्याआधीच नवजात बाळाला वॉशरूममधील कचऱ्याच्या डब्यात ठेवले असल्याचे उघड झाले. मुलगी अल्पवयीन असल्याने, ती गर्भवती कशी झाली याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा की नाही याचीही चौकशी अधिकारी करत आहेत. तसेच आईची देखील चौकशी पोलीस करत असून पोलीस या प्रकरणाच्या तळागाळाशी जाण्यासाठी कंबर कसून तपास करत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात प्रायव्हेट पार्ट्समध्ये फंगल इन्फेक्शन का होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Suryakumar Yadav : माझ्या नावानं खोटं..., व्हायरल पोस्टवर सूर्यकुमार यादवची सणसणीत चपराक, सूर्यवंशीसाठी खास मेसेज

French President Macron: मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष असलेल्या हॉटेलजवळ स्फोट; जगभरात खळबळ

Maharashtra News Live Update: आमदारांच्या बंद पडलेल्या कुक्कुटपालन केंद्रात आदिवासी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह

Monsoon Foot Care: पावसाळ्यात चप्पल लागून पायावर फोड येतात? हे ७ सोपे उपाय करतील इन्फेक्शन आणि दुर्गंधी दूर

SCROLL FOR NEXT