Tejas Aircraft Crash in Rajasthan Saam TV
देश विदेश

Tejas Aircraft Crash in Rajasthan : मोठी दुर्घटना! भारतीय लष्कराचं लढाऊ विमान थेट हॉस्टेलवर कोसळलं

Rajasthan Aircraft Crash : ही दुर्घटना मंगळवारी प्रशिक्षणादरम्यान घडली. सुदैवाने या दुर्घटनेतून पायलट बचावला आहे. या दुर्घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Ruchika Jadhav

Rajasthan News :

राजस्थानमधील जैसलमेर येथे भंयकर घटना घडली आहे. भारतीय लष्कराचं तेजस लढाऊ विमान एका हॉस्टेलवर कोसळलंय. ही दुर्घटना मंगळवारी प्रशिक्षणादरम्यान घडली. सुदैवाने या दुर्घटनेतून पायलट बचावला आहे. या दुर्घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. जवाहर नगर, जैसलमेर येथे ही घटना घडली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. ते ज्या ठिकाणी भारत शक्ती कार्यक्रमाला संबोधित करत आहेत तेथून अपघाताचं ठिकाण सुमारे 100 किमी अंतरावर आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, घटनेमध्ये हॅलिकॉप्टर आगीच्या विळख्यात थेट मेघवाल मसाजाच्या हॉस्टेलवर आदळलं. हॅलिकॉप्टर पडल्याचं समजताच येथील विद्यार्थी आणि परिसरातील अन्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करू लागले. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमनदलाची वाहने देखील तात्काळ घटनास्थळी पोहचली. सध्या अग्निशमनदलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT