Crime News Saam tv
देश विदेश

Shocking News : मृत्यूनंतर नेमकं काय होतं? रहस्य जाणून घेण्याच्या नादात ९ वीच्या मुलानं स्वतःचाच घेतला जीव

Shocking Incident Meerut: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलाने मृत्यूनंतरचे जीवन जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी, आपल्या कुटुंबासमोर स्वत:वर गोळी झाडत मृत्यूला ओढवून घेतलं.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलाने मृत्यूनंतरचे जीवन जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी, आपल्या कुटुंबासमोर स्वत:वर गोळी झाडत मृत्यूला ओढवून घेतलंय. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून, या घटनेनंतर कुटुंबियांनी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. या धक्कादायक प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता नववीत शिकणाऱ्या युवराज राणाने मृत्यूपूर्वी गुगल आणि यूट्यूबवर मृत्यूनंतर काय होते, मृत्यूच्या पद्धती आणि आत्मा कुठे जातो, असे सर्च केले होते. सर्च केल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचललंय. तसेच स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहलेली नाही.

यासंदर्भात स्टेशन हाऊस ऑफिसर धर्मेंद्र कुमार यांनी सांगितले, ही धक्कादायक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास मेरठ शहरातील एपेक्स कॉलनीमध्ये घडलीय. युवराज राणा असं तरूणाचे नाव असून, त्याने स्वत:वर गोळी झाडली. मृत्यूनंतर नेमकं काय होतं? हे जाणून घेण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी कुटुंबियांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. मुलाकडे पिस्तूल कुठून आले याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहे.

प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार,युवराज वाईट संगतीत होता. या कारणामुळे त्याला आई आणि भाऊ नेहमी ओरडत असत. कुटुंबियांनी त्याची दुचाकी देखील विकली होती. त्यानंतर अधिक चितेंत राहू लागला. घरच्यांशी बोलणे त्यानं टाळले असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी कुटुंबियांनी पोलीसांत तक्रार जरी दाखल केली नसली तरी, य घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT