ED Attack  Saam TV
देश विदेश

Attack on ED Team West Bengal : आधी घेरलं मग विटा, दगडांनी कारची तोडफोड; धाड टाकण्यासाठी निघालेल्या EDच्या पथकावर बंगालमध्ये हल्ला

Team of ED attacked during raid : टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी ईडीचे अधिकारी आले होते. त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा दलाचे कर्मचारीही उपस्थित होते.

प्रविण वाकचौरे

Attack on ED Team :

पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे . अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. छापा टाकण्यासाठी ईडीची वाहने उत्तर 24 परगणा येथे पोहोचली होती. तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले आणि टीमवर हल्ला केला. दरम्यान ईडीच्या आणखी एका पथकाने टीएमसी नेते आणि माजी अध्यक्षांच्या घरावर छापा टाकला आहे.

रेशन घोटाळा प्रकरणात तपास यंत्रणेचे पथक शुक्रवारी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखली गावात पोहोचले होते. टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी ईडीचे अधिकारी आले होते. त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा दलाचे कर्मचारीही उपस्थित होते. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र गावात ईडीची वाहने पाहून गावातील 200 हून अधिक लोक जमा झाले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. ग्रामस्थांनी ईडी आणि सुरक्षा दलाच्या वाहनांची तोडफोड केली. जमावाने ईडीच्या सहाय्यक संचालकांची गाडीही सोडली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

रेशन घोटाळ्याप्रकरणी माजी पालिका अध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर आध्ये यांच्या घरावर हा छापा टाकण्यात येत आहे. मात्र येथे ईडीची कारवाई शांततेत सुरू आहे.

काय आहे रेशन घोटाळा प्रकरण?

रेशन घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. पश्चिम बंगालमधील लाभार्थ्यांना दिलेले रेशन बाजारात विकले जात होते, असे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. गिरणी मालक आणि वितरकांनी मिळून सुमारे 30 टक्के रेशन विकले गेले आहे. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत अनेक छापे टाकले असून एका गिरणी मालकालाही अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT