Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: निर्दयीपणाचा कळस! भांडी न धुतल्याने शिक्षिकेची विद्यार्थीनीला अमानुष मारहाण; नेटकऱ्यांचा संताप Video Viral

हा Video पाहून तुमचीही तळपायाची आग मस्तकाला जाईल. व्हिडिओमध्ये शिक्षिका विद्यार्थीनीला अमानुष मारहाण करताना, इतकेच नव्हेतर तिचा गळा आवळताना दिसत आहे.

Gangappa Pujari

Uttarakhand: सोशल मीडियावर नेहमी नवनवे व्हिडिओ शेअर होत असतात. ज्यामध्ये अनेकदा शाळा, कॉलेजमधील शिक्षक आणि विद्दार्थ्यांची धमाल मस्तीही पाहायला मिळत असते. कधी विद्यार्थ्यांच्या मस्तीची तर, शिक्षिकांच्या धमाल डान्सचे हे व्हिडिओ म्हणजे गुरू शिष्याच्या नात्याचा गोडवाच सांगत असतात.

पण, सध्या एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक शिक्षिका आपल्या विद्यार्थीनीला अमानुश मारहाण करताना दिसत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओचे सत्य, चला जाणून घेवू.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तराखंडमधील (Uttarakhand) पौडी जिल्ह्याच्या एका शाळेतील हा व्हायरल व्हिडिओ आहे. शिक्षिकेने आपल्या विद्यार्थीनीला खरकटी भांडी धुण्यास सांगितली, मात्र विद्यार्थीनीने ती भांडी न धुतल्याने रागाच्या भरात ही मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संपातजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओमध्ये महिला शिक्षिका विद्यार्थीनीच्या कानाखाली लगावताना दिसत आहे, त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी ती विद्यार्थीनीचा गळाही आवळताना दिसत आहे. यावेळी व्हिडिओ शूट झाल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या शिक्षिकेवर कठोक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या व्हिडीओची सत्यता तपासल्यानंतर गुरुराम राय इंटर कॉलेजमध्ये आयोजित एनएसएस कॅम्पदरम्यान हा प्रकार घडला असून शिक्षण विभागाने पौरी जिल्ह्यातील देवला पौखल या भागातील ही घटना असल्याचं सांगितलं आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून अधिक चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. पण हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

SCROLL FOR NEXT