vijay thalapathy news Saam tv
देश विदेश

तामिळनाडूच्या राजकारणात ट्विस्ट; २ आमदार असलेल्या पक्षाचा विजय यांच्यावर हल्लाबोल

vijay thalapathy news : तामिळनाडूच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. २ आमदार असलेल्या पक्षाचा विजय यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

Vishal Gangurde

तामिळनाडूच्या राजकारणात ट्विस्ट

छोटा पक्ष 'व्हीसीके'कडून विजय यांच्या पक्षावर हल्लाबोल

विजय यांच्यासमोर तामिळनाडूत सत्ता स्थापन करण्याचे आव्हान

तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात ट्विस्ट निर्माण होताना दिसत आहेत. या विधानसभा निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळालेलं नाही. सर्वात अधिक जागा जिंकणाऱ्या विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बहुमत सिद्ध करता आलेलं नाही. बहुमतासाठी जुळवाजुळवी सुरू असतानाच तामिळनाडूच्या राजकारणात महत्व प्राप्त झालेल्या छोटा पक्ष 'व्हीसीके'ने हल्लाबोल केला आहे. वैयक्तिकरित्या भेट न घेता व्हाट्सअॅपवर मेसेज पाठवून पांठिबा मागत आहे, अशा शब्दात 'व्हीसीके' पक्षाने टीका केली आहे.

विजय यांच्या तामिळगा वेट्री कडगम या पक्षाने १०८ जागा जिंकल्या आहेत. त्यात विजय यांनी तामिळनाडूत दोन जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे एक जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे त्यांचा आकडा १०७ होईल. तामिळनाडूत बहुमताचा आकडा हा ११८ आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे ५ आमदारांचं समर्थन मिळणार आहे. त्यानंतरही बहुमताचा आकडा पूर्ण होणार नाही.

आता विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बहुमत कसं मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच व्हीसीके पक्षाने विजय यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तामिळनाडूत व्हीसीके पक्षाचे दोन आमदार आहेत. तामिळनाडूतील सत्ता समीकरण पाहता एक एक आमदार महत्त्वाचा ठरत आहे.

व्हीसीके पक्षाचे महासचिव सिंथनाई सेल्वन यांनी 'एक्स'वर पोस्ट भूमिका मांडली. 'विजय यांना सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत मिळालेलं नाही. विजय यांनी अत्यंत सावधपणे काम करायला पाहिजे. आता या काळात ज्या पक्षांचं समर्थन हवंय, त्या पक्षाच्या प्रमुखांशी समोरसमोर येऊन भेट घ्यायला हवी ना? असा सवाल त्यांनी केला.

'व्हीसीके'चे महासचिव सिंथनाई सेल्वन यांनी पुढे म्हटलं की, 'आता त्यांनी उघडपणे चर्चा करायला पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या प्रभावाखाली येऊ नये. राज्यपालांच्या माध्यमातून भाजपची तामिळनाडूतील घुसखोरी रोखणे महत्वाचे नाही का? आम्ही त्यांना कसं समजवणार, व्हॉट्सअॅप मेसेज करून समर्थन मागत आहेत. आमच्याकडून केवळ उत्तर हवं आहे का?'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT