Congress support strengthens Thalapathy Vijay’s bid to form government in Tamil Nadu. saam tv
देश विदेश

राजकीय घडामोडींना वेग; सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा, विजय थलपतीला कोणाची मिळाली साथ?

Thalapathy Vijay TVK: काँग्रेसने विजय थलपतीला पाठिंबा दिला असून टीव्हीके पक्ष सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. विजय थलपती राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.

Bharat Jadhav

  • तामिळनाडूत सरकार स्थापनेला वेग

  • काँग्रेसने विजय थलपतीला दिला पाठिंबा

  • दोन मंत्रिपदांची मागणी

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या टीव्हीके (तामिळगा वेटी कळघम) पक्ष लवकरच सत्ता स्थापन करणार आहे. टीव्हीके प्रमुख थलपथी विजय आज राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहेत. थलपती विजयला काँग्रेसने दोन मंत्र्यांची मागणी करत टीव्हीकेला पाठिंबा दर्शवला आहे.

टीएनसीसी कार्यालयात लवकरच एक बैठक होणार आहे. बैठकीनंतर काँग्रेसचे पाच आमदार विजय यांची भेट घेऊन राज्यपालांना पाठिंब्याचे पत्र सादर करतील. काँग्रेसने टीव्हीकेला दिलेल्या पाठिंब्यामुळे डीएमकेने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने आपला विश्वासघात केला आहे, असे डीएमकेने म्हटलंय. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील,इशाराही त्यांनीं दिला आहे.

दुसरीकडे AIADMKच्या काही आमदारांनी पक्षाचे सरचिटणीस एडप्पाडी पलानीस्वामी यांना टीव्हीकेला बाहेरून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. त्यावर आज निर्णय घेतला जाईल. तर डाव्या पक्षांनी पाठिंब्या देण्याबाबत ८ मे पर्यंत निर्णय घेऊ असं सांगितलंय. आययूएमएलच्या दोन आमदारांनी डीएमके आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणी किती जागा जिंकल्या?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत नवीन पक्ष टीव्हीके (TVK) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. टीव्हीकेने तामिळनाडूमध्ये १०८ जागा जिंकल्या. डीएमके ५९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर एआयएडीएमकेने ४७ जागा, काँग्रेसने पाच आणि पीएमकेने चार जागा जिंकल्या आहेत.

तामिळनाडू विधानसभा निवडणुका २३ एप्रिल रोजी पार पडल्या आणि ४ मे रोजी निकाल जाहीर झाला. यात टीव्हीकेने उल्लेखनीय कामगिरी केली. या नवीन पक्षाने प्रस्थापित पक्षांना मागे टाकून सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात थलपथी विजय यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT