Political uncertainty rises in Tamil Nadu as internal rifts among MLAs spark speculation of rebellion and possible party split. saam tv
देश विदेश

आखणी एक पक्ष फूटणार? ३० आमदार बंडाच्या भूमिकेत; विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण तापलं

Tamil Nadu Politics : अण्णाद्रमुक पक्षात आमदारांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. निवडणुकीनंतर काही आमदार बंडाच्या भूमिकेत असून पक्ष फुटीची शक्यता निर्माण झाली आहे.

Bharat Jadhav

तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अभिनेता-राजकारणी थलपती विजयच्या नेतृत्वाखालील टीव्हीके हा पक्ष 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी बहुमत मिळाले नाहीये. मात्र राज्यातील अनेक राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहेत.

राज्यातील अण्णाद्रमुक पक्षातील काही आमदार थलपती विजय यांना पाठिंबा देण्यास सहमत आहे. परंतु काहींचा त्याला विरोध आहे. पक्षातील आमदारांमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे आज नियोजित असलेली पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, AIADMK पक्षाच्या 47 आमदारांपैकी बहुतांश आमदारांची TVK ला आपला पाठिंबा देण्यास समर्थन दिले आहे.

थलपती विजयला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्ष श्रेष्ठींनी अद्याप घेतला नाहीये. यावरून आमदारांनी माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे ज्येष्ठ नेते एडप्पाडी यांना एक अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. जर त्यांनी लवकर निर्णय घेतला नाही, तर ३० हून अधिक आमदार पक्षातून बाहेर पडून विजय यांना पाठिंबा देतील. या बंडाचे नेतृत्व सी.व्ही. षण्मुगम हे करत आहेत. अण्णाद्रमुकचे आमदार थोड्याच वेळात सी.व्ही.षण्मुगम यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.

राज्यात उलथापालथ होण्याची शक्यता

AIADMK च्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज चेन्नई येथे होणार होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणी ती पुढे ढकलण्यात आली. पक्षातील एका गट विजय यांच्या TVK या पक्षाला एका वर्षाच्या कालावधीसाठी बाहेरून पाठिंबा देण्यास आग्रही आहे. TVK हा पक्ष राज्य विधानसभेत 'सर्वात मोठा पक्ष' म्हणून उदयास आला असला, तरीही बहुमताचा आकडा त्यांच्याकडे नाहीये.

तर तामिळनाडूच्या २३४ जागांच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. पण TVK ने १०८ आमदारा आहेत. दरम्यान थलपती विजय यांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसकडे पाठिंबा मागितला आहे. आज काँग्रेसने याबाबत निर्णय घेतला असून ते विजयला पाठिंबा देणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, थलपती विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stone Tips: किडनी स्टोनचा धोका चारपट वेगाने वाढेल, हे 5 पदार्थ खाणं आजपासूनच थांबवा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या त्रिकुटाला बेड्या

महिलांमध्ये वाढतोय Ovarian Cancer चा धोका, ही ५ लक्षणे अजिबात करू नका दुर्लक्षित; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Anil Parab : साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना दिलासा; खेड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

MPSC Bharti 2026: आनंदाची बातमी! MPSC द्वारे घेतली जाणार तलाठी भरती; १७०० जागांसाठी होणार परीक्षा

SCROLL FOR NEXT