TAMIL NADU HORROR: 3-YEAR-OLD GIRL ABDUCTED, ASSAULTED AND DIES DURING TREATMENT Saam tv
देश विदेश

Shocking : संतापजनक! बिस्कीट देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला, १९ वर्षाच्या तरुणांकडून ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Tamilnadu Crime News : तामिळनाडूमध्ये 3 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी १९ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात 3 वर्षीय मुलीवर बलात्कार

  • आरोपीने बिस्किटांचे आमिष दाखवून मुलीला सोबत नेलं

  • मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

  • पोलिसांनी १९ वर्षीय आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे

Tamil Nadu Rape Crime News तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घराजवळ खेळत असलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बिहारमधील १९ वर्षीय तरुणाला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास ही मुलगी आपल्या घराजवळ खेळत होती. काही वेळानंतर ती अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. स्थानिक रहिवाशांनीही शोधाशोध केली, मात्र ती कुठेचं सापडली नाही. दरम्यान, एका शेजारी राहणाऱ्या महिलेने पोलिसांना सांगितले की तिने एका तरुणाला त्या मुलीला एका रूमच्या दिशेने घेऊन जाताना पाहिले होते.

संध्याकाळी बराच वेळ उलटल्यानंतरही मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईने परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान जवळच्या झुडपात मुलगी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. स्थानिकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले, मात्र तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलीस तपासात, आरोपी विबिन मंच याने मुलीला बिस्किटांचे आमिष दाखवून सोबत नेले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून गुन्ह्याशी संबंधित सर्व बाबींचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे तामिळनाडूमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

SCROLL FOR NEXT