India's First Metaverse Wedding of Tamilnadu Couple
India's First Metaverse Wedding of Tamilnadu Couple Twitter/@kshatriyan2811
देश विदेश

Metaverse Wedding: लग्नाच्या रिसेप्शनला Harry Potter थीम! पहा तामिळनाडूच्या जोडप्याचं मेटावर्स लग्न

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेन्नई: आपलं लग्न थाटामाटात व्हाव असं अनेक जोडप्यांना वाटतं. पण, आपलं लग्न जरा हटके आणि जगावेगळं करण्याची हिंम्मत सगळेचजण करत नाही. आतापर्यंत लग्नात बुलेटवर एंन्ट्री, हेलिकॉप्टरवर एंन्ट्री, जेसीबीवर एंन्ट्री असे अनेक प्रकाराचे अनोखे लग्न (Unique Wedding) आपण बघितले असेल. पण आता तामिळनाडूच्या एका उच्चशिक्षित जोडप्यानं आपल्या लग्नाचं रिसेप्शन थेट व्हर्चुअल (Virtual Wedding) पद्धतीने मेटावर्समध्ये (Metaverse) आयोजित केलंय. या लग्नाला जगभरातून लोकं उपस्थित राहू शकतात. यासाठी निमंत्रितांना यूजर आयडी आणि पासवर्ड देण्यात येणार आहे. (Indias Firs't Metaverse Wedding of Tamilnadu Couple)

हे देखील पहा -

दिनेश एसपी (Dinesh SP) आणि जननंधिनी रामास्वामी (Janaganandhini Ramaswamy) असं या जोडप्याचं नाव आहे. त्यांच्ये रिसेप्शन हॉगवॉर्ट्स किल्ल्यातील आभासी मुख्यालयात होणार आहे. जननधिनी ही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, तर दिनेश आयआयटी मद्रासमध्ये प्रोजेक्ट असोसिएट म्हणून काम करतो. हे जोडपे ६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांचे लग्न तामिळनाडूतील शिवलिंगपुरम गावात होणार आहे. दिनेशलाच लग्नाचे रिसेप्शन मेटाव्हर्समध्ये आयोजित करण्याची कल्पना सुचली आणि त्याला अर्थातच जननंधिनीची संमती होती. या जोडप्याचे आभासी अवतार मेटाव्हर्सच्या ठिकाणी पाहुण्यांना भेटतील, या कार्यक्रमात वधूचे दिवंगत वडिलांही अवताराच्या रुपात व्हर्चुअली उपस्थित असणार आहे.

दिनेशने एका इंग्रजी वृत्तसंस्थेला सांगितले की, तो क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेनचा वापरकर्ता आहे, गेल्या एक वर्षांपासून इथरियमचे मायनिंग करत आहे. यातूनच त्यांना त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन मेटाव्हर्समध्ये आयोजित करण्याची कल्पना सुचली, कारण व्हर्च्युअल जगामागील मूळ तत्त्वामध्ये ब्लॉकचेन आहे. जननधिनी यांना देखील वाटले की त्यांच्या लग्नासाठी ही एक चांगली कल्पना आहे, कारण हे जोडपे मूळतः इन्स्टाग्रामवर भेटले होते. तसेच कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांंना हा मार्ग योग्य वाटला.

दिनेशने कॅटिक्स टेकच्या विघ्नेश सेल्वाराजशी संपर्क साधला होता, जो टार्डायव्हर्स डिझाइन करत होता, जिथे लोक भेटू शकतात आणि खेळू शकतात. दिनेश आणि जननंधिनी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये, पाहुणे त्यांच्या अवतारांसाठी भारतीय पारंपारिक ते पाश्चात्य पोशाख निवडण्यास सक्षम असतील आणि GPay किंवा Crypto द्वारे जोडप्यांना भेटवस्तू देखील देऊ शकतील.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur News: बैलगाडा घाटात कौटुंबीक वाद, तुफान हाणामारीत तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Today's Marathi News Live: देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे; निलेश लंके

Prajakta Mali : "वादळापूर्वीची शांतता..."; प्राजक्ता माळी असं का म्हणतेय ?

Rashid Khan Six: पैज लावा, असा शॉट पाहिलाच नसेल! राशिदने खेचला 'स्नेक स्टाईल' षटकार

Skin Care: चेहऱ्यावर साबण लावताय?होऊ शकतात या गंभीर समस्या

SCROLL FOR NEXT