Former Syrian President Bashar al-Assad death penalty news saam tv
देश विदेश

मोठी बातमी! 24 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्षांना मृत्यूदंडाची शिक्षा; जगभरात खळबळ

Former President Court Sentenced Death: सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांचे भाऊ माहेर अल-असद यांना न्यायालयाने अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना मृत्युदंडाची शिक्षा

  • बशर अल-असद यांचे भाऊ माहेर अल-असद यांनाही मृत्युदंडाची शिक्षा

  • मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्धगुन्ह्यांशी संबंधित आरोपांमध्ये हा निकाल देण्यात आला

सीरियाचे माजी अध्यक्ष बशर अल असद यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. सीरियाच्या एका न्यायालयानं माजी राष्ट्रपती बशर असद आणि त्यांचा लहान भाऊ माहेर यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांचे बंधू माहेर अल-असद यांना मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्धगुन्ह्यांसाठी ही शिक्षा सुनावण्यात आलीय. दोघांनाही त्यांच्या अनुपस्थितीत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कायदेशीर मार्गांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आणि त्यांना न्यायव्यवस्थेसमोर आणण्याचे प्रयत्न सुरूच राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केलंय.

सीरियामध्ये १४ वर्षे यादवी युद्ध सुरू होतं. या संघर्षात ५ लाख जणांचा मृत्यू झाला होता. संघर्षाच्या काळातील गुन्हे आणि युद्ध अपराधांसाठी त्यांना शिक्षा ठोठावण्यात आलीय. दरम्यान शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी बशर अल असद न्यायालयात नव्हते. डिसेंबर २०२४ मध्ये बंडखोरी झाल्यानंतर सत्तांतर घडलं होतं. त्यानंतर बशर अल-असद आणि माहेर यांनी सीरियातून मॉस्कोला पलायन केले होतं.

अवघ्या ११ दिवसांत घडलेल्या या मोहिमेनंतर असद यांच्या दीर्घकालीन राजवटीचा अंत झाला होता. सीरियामध्ये सत्तापालट झाल्यानंतर बशर अल असद यांनी रशियात आश्रय घेतला होता. याच प्रकरणात असदचा मामेभाऊ आतिफ नजीबलादेखील मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. न्यायालयानुसार बशर अल-असद यांना एकापेक्षा अधिक लोकांना आणि लहान मुलांची हत्या करणे, त्यांना यातना देणं, त्यांना अटक करणे या गुन्ह्यात दोषी करार करण्यात आले आहे. तसेच त्यांचा भाऊ माहेर हा त्यावेळी लष्कराचे कमांडर होते. त्यांना असद सरकारचा लष्कर प्रमुख मानले जात होते.

बंडखोरी मोडून काढण्यासाठी कडक कारवाई केली

२०११ मध्ये देशात झालेल्या सरकारविरोधातील बंडखोरी मोडून काढण्यासाठी असद यांनी कठोर कारवाई केली होती. सरकारविरोधातील आंदोलन मोडून काढण्यासाठी त्यांनी लष्कर कारवाई केली होती. आंदोलनात सहभागी असलेल्यांना अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

रिलस्टारमुळे ट्राफिक जाम, पुणेकरांना घाम, पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रीलबाजांचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT