Kirodi Lal Meena admitted to Jaipur hospital after swine flu infection saam tv
देश विदेश

कॅबिनेट मंत्र्यांना स्वाइन फ्लूची लागण! प्रकृतीची विचारपूस करण्यास आलेल्या आरोग्यमंत्र्यांनाच रोखलं

Swine Flu Infected Minister Health Minister Stopped Hospital Visit: राजस्थानचे कॅबिनेट मंत्री किरोडीलाल मीना स्वाइन फ्लूने बाधित झाल्याने रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलेल्या आरोग्यमंत्र्यांनाही संसर्गाच्या धोक्यामुळे भेटण्यापासून रोखण्यात आले.

Omkar Sonawane

राजस्थानचे कॅबिनेट मंत्री किरोडीलाल मीना यांना स्वाइन फ्ल्यू झाल्याने त्यांना जयपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच यामुळे संसर्ग देखील होऊ शकतो. त्यामुळे त्यांना भेटायला येणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मात्र असे असतानाच त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. याच दरम्यान आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खींवसर किरोड लाल मीना यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात आला तेव्हा त्यांना स्वाइन फ्ल्यूचा धोका सांगत रोखण्यात आले.

आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खीवसर हे किरोडीलाल मीना यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी त्यांना डॉक्टरांनी किरोडीलाल मीना यांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याने भेट घेतल्यास संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. असे सांगण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी गजेंद्र सिंह खींवसर यांना आत जाण्याची परवानगी दिली नाही. त्यांनीही डॉक्टरांचा सल्ला मानून रुग्णालयाबाहेरूनच किरोड़ीलाल मीना यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. स्वाइन फ्लूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन मंत्री, आमदार आणि पक्षातील अनेक वरिष्ठ नेते फोनवरूनच किरोड़ीलाल मीना यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही फोनवरून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

मात्र, दुसरीकडे किरोड़ीलाल मीना यांच्या काही जवळच्या व्यक्तींना रुग्णालयात आत जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. या व्यक्तींनी मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटोही काढल्याचा दावा करण्यात आला आहे. ही नंतर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. याच फोटोमुळे आता रुग्णालयाच्या प्रोटोकॉलवर प्रश्न उपस्थित होत आहेत. संसर्गाचा धोका असल्याने आरोग्य मंत्र्यांनाही रुग्णाला भेटण्यापासून रोखण्यात आले, मग काही जवळच्या व्यक्तींना आत जाण्याची परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

ind vs wi odi squad 2026 : भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा, विराट कोहलीबाबत मोठा निर्णय, जडेजाचं कमबॅक

UPI पेमेंटवरील शुल्कावरून राजकारण तापलं, UPI TAX रद्द करण्याची राहुल गांधींची मागणी

Maharashtra News Live Update: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात येणाऱ्या कोणत्याही मंत्र्याला अडवू नका: जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन

Pune-Beed Train: गुड न्यूज! पुण्यावरून बीडला जा सुसाट, नवीन रेल्वे धावणार; कोणत्या मार्गाने जाणार अन् थांबे किती?

SCROLL FOR NEXT