देश विदेश

Survey Reveals Shocking Truth: किती टक्के मित्र उसने पैसे परत करतात? सर्व्हेतून धक्कादायक वास्तव समोर, वाचा स्पेशल रिपोर्ट

Survey report : उसने घेतलेले पैसे बुडवून मित्रानेच मित्राला चूना लावल्याच्या अनेक घटना घडल्यात. किती टक्के मित्र उसने पैसे परत करत नाहीत? त्यासंदर्भात प्युबिटीने सर्व्हे केलाय.. त्यात धक्कादायक माहिती उघड झालीय... नेमका काय आहे हा सर्व्हे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....

Bharat Mohalkar

मित्राला उसणे पैसे दिल्यानंतर तुम्ही हे वाक्य नक्की ऐकलं असेल....अनेकदा मित्राला उसने दिलेले पैसे परत आलेच नाहीत, असंही तुमच्यासोबत घडलं असेल... हे फक्त तुमच्यासोबतच घडतंय, असं नाही.. कारण पुबिटीच्या रिपोर्टनुसार तब्बल 73 टक्के मित्र पैसे बुडवे असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय..

@pubity चा इंस्टाग्रामवर 28 मे ला मित्राच्या उसनवारीसंदर्भात सर्व्हे

पैसे घेणाऱ्यांपैकी 27 टक्के मित्र उसणे पैसे परत करत असल्याचं स्पष्ट

सर्व्हेत 73 टक्के मित्रांना दिलेले पैसे परत येत नसल्याचा दावा

73 टक्के लोकांनी मित्र पैसे बुडवे असल्याचं सांगितलं

तुम्ही उसने दिलेले परत मागताना मित्राकडून सातत्याने उद्या देतो, संध्याकाळी देतो, असं सांगितलं जातं... कधी कधी पैसे देणाऱ्यालाच भिकाऱ्यासारखे पैसे मागावे लागतात... मात्र यानंतरही मित्र पैसे परत करण्याऐवजी तुमचे फोनही उचलणं बंद करतो आणि तुमचे पैसे बुडवतो. त्यातून वाद निर्माण होतात. अशीच घटना नुकतीच नांदेडमध्ये घडली.

उसने घेतलेले पैसे परत न केल्याने मित्रानेच मित्राची इनोव्हा कारच पेटवून दिली.. खरंच मैत्री आणि पैशांचा व्यवहार सोबत चालू शकतात का? असा प्रश्न निर्माण झालाय.. मात्र तुमचा मित्र तुमचे पैसे वेळेत परत करत असेल तर तुम्ही नशीबवान आहात, असं समजा....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवरायांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा, युनेस्काच्या यादीत समावेश, जाणून घ्या नावे | VIDEO

Jai Shivaji : जय शिवाजी! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत, वाचा इतिहास| PHOTO

सावधान! दूधात तेल आणि चुना? तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध ? आमदारांनी डेमो दाखवला...कारवाई कधी?

Aeroplane Etiquette: टूथपेस्ट ते परफ्यूम... विमानात पायलटला कोणत्या गोष्टी नेण्यास बंदी असते?

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचा आठवावा प्रताप! छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना UNESCO World Heritage दर्जा

SCROLL FOR NEXT