मामाच्या मुलीशी लग्न करायचा विचार करात असाल तर थांबा... कारण मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंद येऊ शकते? होय तुम्ही बरोबर ऐकतायत...जवळच्या रक्ताच्या नात्यातील विवाहांमुळे पुढील पिढीच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर आता सर्वोच्च न्यायालयाने मोठी चिंता व्यक्त केलीय.. अशा विवाहांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करता येईल का, अशी विचारणा कोर्टाने केंद्र सरकारला करत नोटीस बजावली आहे. नेमकं प्रकरण काय? पाहूयात...
बेंगळुरू येथील एका दृष्टिहीन विद्यार्थ्यानं रक्ताच्या नात्यात विवाह रोखण्यासंदर्भात याचिका दाखल
आपले आई-वडील जवळच्या रक्ताच्या नात्यातील असल्याने जन्मजात आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं त्याने याचिकेत म्हटलंय.
याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये रक्ताच्या नात्यात विवाह करण्याचे प्रमाण अधिक
अशा विवाहांमुळे पुढील पिढीच्या आरोग्याला धोका निर्माण होतो...
अशा लग्नामुळे जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये जन्मजात व्यंग, अंधत्व येऊ शकतं
शारीरिक किंवा मानसिक विकासातील अडथळे निर्माण होतात
बहिरेपणा, बालमृत्यूचा धोका वाढू शकतो, असं याचिकाकर्त्यानं म्हटलयं...
दरम्यान याचिकाकर्त्याच्या म्हणण्यावर कोर्टानं काय मत मांडलयं...पाहूयात...
कोणाशी विवाह करायचा हा व्यक्तीच्या खासगी आयुष्याशी आणि वैयक्तिक स्वातंत्र्याशी निगडित विषय आहे. त्यामुळे न्यायालय थेट अशा विवाहांवर बंदी घालू शकत नाही
मात्र यावर कायदा करण्याचा अधिकार संसदेच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यामुळे केंद्र सरकारनं यावर भूमिका घ्यावी
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी या विवाहांमागील वैज्ञानिक कारणांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज व्यक्त करत अंगणवाडी आणि ग्रामपंचायत स्तरावर माहिती पोहोचवण्याचा पर्यायही सुचवलाय...
मुळात मुस्लिम पर्सनल लॉमध्ये काही जवळच्या नात्यांतील विवाहांना मान्यता आहे, तर हिंदू विवाह कायद्यात विशिष्ट नात्यांमध्ये विवाहास प्रतिबंध आहे. या याचिकेमुळे विवाहविषयक कायदे आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आता सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीशीनंतर केंद्र सरकार रक्तातील नात्यांमध्ये विवाह करण्याची बंदी घालणार का? त्यासाठी कायदा करणार का? याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.