Shiv Sena, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Saam Tv
देश विदेश

ठाकरे की शिंदे...शिवसेना कुणाची? 'सर्वोच्च' सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीत मुक्काम, मोठी अपडेट समोर

Shiv Sena name and bow and arrow symbol case Supreme Court : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होत आहे. सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Supreme Court Hearing on Shiv Sena Symbol Row Today : शिवसेना नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणाचे, या महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी होत आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऐन मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेना चिन्ह वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गेल्या महिन्यात ठाकरे गटाच्या वकिलांनी आपला संपूर्ण युक्तिवाद न्यायालयात पूर्ण केला होता. त्यानंतर आजपासून शिंदे गटाच्या वकिलांकडून यावर प्रत्युत्तर (Rebuttal) दिले जाणार आहे.

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर ही सुनावणी पार पडत आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर आणि पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आज शिंदे गटाच्या वतीने कोणता बचाव आणि कायदेशीर युक्तिवाद मांडला जातो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सुनावणीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना

राज्य सरकारची नियोजित मंत्रिमंडळ बैठक पार पडत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठक सोडून अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. या महत्त्वाच्या बैठकीला शिंदेंची गैरहजेरी आणि त्यांचा तातडीचा दिल्ली दौरा यामुळे राजकीय गोटात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक टप्प्यावर आहे.त्याआधी शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. शिंदेंनी दिल्ली दौऱ्याचे कारण स्पष्ट केले.

बाळासाहेबांचे विचार गोठवले आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी -शिंदेंची टीका

बाळासाहेबांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता, ते देव्हाऱ्यात धनुष्यबाण पुजायचे. २०१९ मध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार गोठवले, हिंदुत्व गोठवले, महाराष्ट्रातील जनतेचे बहुमत गोठवलं आणि बाळासाहेबांची घटना देखील गोठवली. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करत आहेत. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि धोरण पुसण्याचे काम सुरु आहे, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे मंगळवारी नवी दिल्लीत दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Cholesterol: हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यास चेहऱ्यावर दिसतात ही 5 लक्षणं, हार्ट अटॅक येण्यापूर्वी धोका ओळखा

Beetroot juice: या 3 लोकांसाठी बीटाचा ज्यूस म्हणजे जणू विष! प्यायलात तर पडेल महागात

Skincare Tips for Men and Women: सुंदर दिसण्यासाठी महिला आणि पुरुषांनी फॉलो कराव्यात ‘या’ 5 सोप्या टिप्स

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक; बीड-जालनामध्ये जाळपोळ

SCROLL FOR NEXT